Bhagat-Singh-Koshyari 
पश्चिम महाराष्ट्र

राज्यपाल म्हणाले....मराठी समजते पण बोलता येत नसल्याची खंत

तात्या लांडगे

सोलापूर : प्रत्येकाला संस्कृत, हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी यासह अन्य भाषाही यायला हव्यात. मातृभाषेचा अभिमान असावा अन्‌ प्रत्येकांनी मातृभाषेचा सन्मान करावा. मी महाराष्ट्राचा राज्यपाल झालो ते माझे भाग्य असून मला मराठी भाषा समजते मात्र, बोलता येत नसल्याची खंत आहे, असे प्रतिपादन उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. 


पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील 15 व्या दिक्षांत समारंभप्रसंगी राज्यपाल कोश्‍यारी बोलत होते. या वेळी कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र कुलगुरु डॉ. विकास कदम, प्रभारी परिक्षा नियंत्रक डॉ. श्रेणिक शहा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी सुरेश पवार, आमदार ऍड. रामहरी रुपनवर, रिपांइचे नेते राजाभाऊ सरवदे, प्राचार्य डॉ. विजयकुमार उबाळे, डॉ. किर्ती पांडे आदी उपस्थित होते. या वेळी 65 जणांना डॉक्‍टरेट (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली तर 54 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. 


श्री. कोश्‍यारी म्हणाले, पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नसून आता पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी राज्याच्या तथा देशाच्या शैक्षणिक धोरणात आपले योगदान देण्याची खरी गरज आहे. 72 वर्षांपूर्वी देशाची गुलामगिरी संपली मात्र, त्यापूर्वी तक्षशिला व नालंदा विद्यापीठाच्या माध्यमातून परदेशातील अनेकजण देशात उच्च शिक्षण घेत होते. आता हळूहळू देशाची शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या प्रगती होऊ लागली आहे. प्रत्येकांनी आपल्या जीवनाचे धेय्य निश्‍चित करुन त्यानुसार वाटचाल करावी, यश निश्‍चित मिळेल, असा सल्लाही राज्यपालांनी या वेळी दिला. मुली शिक्षण असो की अन्य कोणत्याही क्षेत्रात मोठी प्रगती करु लागल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख मांडला. 

180 देशात होतोय योगाचा प्रयोग 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून भारताने जगाला योगा दिला. देशातील चांगल्या जुन्या गोष्टींना उजाळा देण्याची गरज आहे. सध्या जगातील 180 देशात योगाचा प्रयोग केला जात आहे. मात्र, संपूर्ण भारताने अद्याप त्याचा स्वीकार केलेला नाही. देश प्रगतीच्या वाटेवर असून प्रत्येकांनी त्यात योगदान दिल्यास आगामी काही वर्षांत जागातील तिसऱ्या क्रमांकाचा देश भारत होईल, असा विश्‍वासही राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी व्यक्‍त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT