gram panchayat election result women victory 18 villages in Sangli political marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

लय भारी : सांगलीत १८ गावांत महिलाराज; २७ महिलांना थेट कामाची संधी

सकाळ वृत्तसेवा

तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्‍यात ३९ गावांत सरपंच, उपसरपंच निवडीनंतर १८ ग्रामपंचायतींत महिलाराज सुरू झाले आहे. २७ सावित्रीच्या लेकींना गाव पातळीवर थेट  काम करण्याची संधी मिळाली. याशिवाय तीन महिला सरपंचपदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे या निवडीत महिलांनी बाजी मारली, असेच म्हणावे लागेल.

राजकारणात स्त्री पुरुष समानता नाही असे मानले जाते. ते काहीसे खरे असले तरी तासगाव तालुक्‍यातील झालेल्या निवडीनंतर महिलांनी निम्म्या तालुक्‍याचा कारभार हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ३९ ग्रामपंचायतींचा निकाल लागल्यानंतर ३९१ निवडलेल्या सदस्यांमध्ये २१३ महिला सदस्या निवडून आल्या आहेत. अनेक गावांमध्ये एकूण सदस्यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. या ३९ पैकी २१ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित आहे. त्यापैकी १८ ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचांनी कारभार हाती घेतला आहे. तर कौलगे, विजयनगर आणि जुळेवाडी या तीन ग्रामपंचायतीत महिला सरपंचपदे आरक्षित असूनही त्या त्या गटातील महिला निवडून न आल्याने ती पदे रिक्त राहिली आहेत. त्यापैकी दोन पदे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी. तर एक ओबीसी प्रवर्गातील महिलासाठी आरक्षित आहेत. 

सर्वसाधारण गटातून नऊ, ओबीसी प्रवर्गातून पाच, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील एक महिला सरपंच झाली आहे. नरसेवाडी आणि गौरगाव या दोन गावामध्ये सरपंच आणि उपसरपंच दोन्ही पदे महिलांकडे आली आहेत. तेथे खऱ्या अर्थाने महिला राज म्हणावे लागेल. तर धुळगाव आणि नागावकवठे या दोन गावातील कारभाराची धुरा मुस्लिम समाजातील महिला सांभाळणार आहेत हे विशेष. एकूणच सावित्रीच्या लेकींचा डंका केवळ शिक्षणात वाजतो आहे असे नाही तर आता राजकारणातही वाजू लागला आहे. 

पदाधिकारी-प्रशासन महिलांच्या हाती
तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार, पंचायत समिती सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी अशी प्रथम क्रमांकाची पदे ही तालुक्‍यात महिलाच भूषवत आहेत, हे आणखी विशेष योगायोग.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राज्याच्या दर्शनाला

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT