gram panchayat voting social distance and no mask wear in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

ग्राम पंचायत निवडणुकीत सामाजिक अंतराचा फज्जा

सकाळ वृत्तसेवा

 बेळगाव : मंगळवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानावेळी सामाजिक अंतराचा फज्जा उडाला.   जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक आणि मतदाना दिवशी कोविड संबंधित सर्व नियमांचे पालन करण्याची सूचना केली होती. मात्र मतदानादिवशी मतदान  केंद्रावर आणि मतदान केंद्राबाहेरही गर्दी दिसून आली. यामधील बरेचजणांनी मास्क घातले नव्हते तर सामाजिक अंतरही राखण्यात आले नाही.

मात्र आरोग्य खात्याच्या परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्त्या, आणि आशा कार्यकर्त्यांच्या वतीने प्रत्येक मतदान केंद्राबाहेर सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मतदान करण्यास येणाऱ्या मतदारांना मास्क घालण्याची वारंवार सूचनाही करण्यात येत होती. मात्र जवळजवळ सर्वच मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांग लागली होती.तर मतदान केंद्राबाहेर मतदारांना चिठ्ठ्या देण्यासाठी संबंधित उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. यामुळे मतदान केंद्राच्या आवारात तसेच मतदान केंद्र बाहेरही सामाजिक अंतर पाळण्यात आला नाही.

 बऱ्याच मतदान केंद्रांवर मास्क घालून न आलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मास्क असल्यासच केंद्राच्या आत सोडण्यात येणार असल्याचे सांगितले. यामुळे मास्क न घातलेल्या मतदारांना मास्क घालून यावे लागले. तरीही बऱ्याच ठिकाणी या नियमांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT