पश्चिम महाराष्ट्र

राज्यातील शहरालगतच्या शाळा महाविद्यालयांनाही सुटी

सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकाळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील. अशी माहिती शनिवारी (ता.14) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. दरम्यान यामध्ये ग्रामीण भागाचा समावेश नाही (ग्रामपंचायत क्षेत्र). त्यामुळे सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये शहारातून मार्गक्रमण करणारे विद्यार्थी यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जावेच उद्यापासून (साेमवार) जावेच लागणार आहे. 

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये खूद्द शहराची हद्द साेडून शाळा आणि महाविद्यालयांची माेठ्या प्रमाणात संख्या आहे. यामध्ये कराड शहराच्या लगत सैदापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत शैक्षणिक हब आहे. याबराेबरच सातारा शहरालगतच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत खासगी शाळा आणि महाविद्यालय आहे. शासनाच्या आराेग्य विभागाच्या निर्देशाप्रमाणे सध्या तरी ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळा आणि महाविद्यालय यांचे दैनंदिन शैक्षणिक काम सुरुच ठेवावे लागणार आहे. दरम्यान ग्रामपंचायत क्षेत्रातील संबंधित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येणारे विद्यार्थी हे माेठ्या प्रमाणातून शहरातूनच मार्गक्रमण करीत असतात. त्यांच्या शाळा आणि महाविद्यालय हे सुरुच राहणार आहे. 
 

शहरातील विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षणासाठी जाताना त्यांच्या आणि ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे अशी शंका उपस्थित केली जात आहे. यामुळे ग्रामपंचायत क्षेत्रातील शाळांना देखील सुट्टी द्यावी अशी चर्चा हाेत आहे. ही चर्चा जिल्हा प्रशासनापर्यंत पाेहचली. परंतु सध्यस्थित सातारा जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत क्षेत्रबाबतचा आदेश अथवा राज्याच्या शिक्षण विभागाकडून काेणताही नवा आदेश प्राप्त झाला नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आज (रविवार) काढलेल्या आदेशातही नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रा व्यतरिक्त अन्य काेणत्याही स्तरांवर लागू नाही असे नमूद करण्यात आले आहे.


आज (रविवार) सायंकाळी शासनाने महानगरपालिका, पालिका आणि नगरपंचायत क्षेत्राच्या परिघाबाहेरील ग्रामीण क्षेत्रात येतात परंतु या संस्था नागरी क्षेत्राला लागून आहेत. 
तरी महानगरपालिका, पालिका आणि नगरपंचायत क्षेत्रालगतच्या शाळा आणि महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्ट्या जाहीर करण्यात आली आहे. 
दरम्यान त्या क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा निर्धारीत वेळेतच हाेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. 


#BigBreaking कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अंगणवाड्या, शाळा, कॉलेजेस बंद

सातारा जिल्ह्यात संस्थांना धार्मिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे ती रद्द करण्यात येणार असून पुढील आदेश होईपर्यंत कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत याची दक्षता संयाेजकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहेत.






 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT