Grapes Currant esakal
पश्चिम महाराष्ट्र

सांगली, तासगावला चार दिवसांनंतर बेदाणा सौदे पूर्ववत; अडत्यांची मोठी रक्कम अडकली, शेतकरी संकटात

बेदाणा व्यापाऱ्यांकडे सांगली व तासगावच्या अडत्यांची मोठी रक्कम अडकली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बेदाण्याचा हंगाम सुरू असल्याने आवकही मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना पैशांची आवश्‍यकता असल्याने तेही विक्रीसाठी आणत आहेत.

सांगली : बेदाणा व्यापाऱ्यांकडे सांगली व तासगावच्या अडत्यांची मोठी रक्कम अडकली आहे. अडत्यांसह शेतकऱ्यांसमोर (Farmers) आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातूनच अडत्यांनी सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद ठेवले होते. ते पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे अडते व शेतकरीही संकटात सापडले आहेत. सांगली, तासगाव येथे सौद्यात एकावेळी तीन हजार टन बेदाण्यांची आवक होत आहे.

सांगलीत बुधवारी आणि शुक्रवारी, तर तासगावमध्ये सोमवार, गुरुवार आणि शनिवारी बेदाणा (Grapes Currant) सौदे होत आहेत. बेदाण्याचा हंगाम सुरू असल्याने आवकही मोठ्या प्रमाणात असून शेतकऱ्यांना पैशांची आवश्‍यकता असल्याने तेही विक्रीसाठी आणत आहेत.

महिन्याला दोन्ही ठिकाणी ५१ हजार टन बेदाण्याची विक्री होत आहे. फेब्रुवारीपासून व्यापाऱ्यांनी अडत्यांची मोठी रक्कम थकविली आहे. व्यापाऱ्यांकडून अडत्यांना ४० दिवसांत पैसे मिळाले पाहिजेत, असा नियम सांगली, तासगाव बाजार समितीने केला आहे. मात्र तीन महिने झाले, तरीही व्यापाऱ्यांकडून अडत्यांना पैसे मिळाले नाहीत.

पैशांसाठी अडत्यांनी व्यापाऱ्यांकडे तगादा लावल्यानंतर बेदाणा खराब असल्याचे कारण देत व्यवहार रद्द करण्याची धमकी दिली जात आहे. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेला कंटाळून अडत्यांनी चार दिवस बेदाणा सौदेच बंद केले. व्यापाऱ्यांनी पैसे दिल्यानंतरच सौदे सुरू करण्याची भूमिका अडत्यांनी घेतली होती. त्यानंतर बैठक घेऊन पुन्हा सौदे सुरू झाले आहेत.

बेदाणा सौदे केवळ तीन-चार दिवस बंद होते. ते पूर्ववत सुरू झाले आहेत. व्यापाऱ्यांनी बेदाणा खरेदी केला. मात्र तो उचललेला नाही. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल तातडीने उचलला पाहिजे, तरच पुढील लिलाव सुरळीत होतील.

-महेश चव्हाण, सचिव, सांगली बाजार समिती

बेदाण्याचे अर्थकारण

  • सांगली, तासगावातील सौद्यांत महिन्याला ५१ हजार टन बेदाण्याची उलाढाल

  • तीन महिन्यांत एक लाख ५३ हजार टन उलाढाल

  • बेदाण्यास सरासरी १२० रुपये किलो दर

  • एक हजार ८३६ कोटी रुपयांची उलाढाल

  • नियमानुसार ४० दिवसांत अडत्यांना पैसे देण्याचा नियम

  • व्यापाऱ्यांनी फेब्रुवारीची रक्कम थकवली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT