Solapur Crime esakal
पश्चिम महाराष्ट्र

जीम करणारा इंजिनिअर हल्लेखोरांना नडला! हल्लेखोर अंधारातून पसार झाले, तिघांच्या शोधासाठी पोलिसांची ५ पथके; घटनास्थळी आरोपींचे रक्त, एक किलोमीटरवर सापडली चप्पल

नवीन गाडी घेतल्याने मैत्रिणीसोबत फिरायला गेलेला आयटी इंजिनिअर सोरेगावजवळून सोलापुरात येताना त्याच्यावर तीन चोरट्यांनी हल्ला केला. त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत एका हल्लेखोराने व्यंकटेश बुधले (वय २५) याच्यावर विळ्याने वार केले. संशयितांच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेची तीन तर विजापूर नाका पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : नवीन गाडी घेतल्याने मैत्रिणीसोबत फिरायला गेलेला आयटी इंजिनिअर सोरेगावजवळून सोलापुरात येताना त्याच्यावर तीन चोरट्यांनी हल्ला केला. त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत एका हल्लेखोराने व्यंकटेश बुधले (वय २५) याच्यावर विळ्याने वार केले. संशयितांच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेची तीन तर विजापूर नाका पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

सोरेगावजवळील आदित्य हॉटेलजवळील एका निर्मनुष्य रस्त्यावरून सोलापूरच्या दिशेने येताना तिघांनी व्यंकटेशची दुचाकी अडवली. अंगावरील दागिने काढून द्यायला सांगितले. त्यावेळी व्यंकटेश त्यांना नडला. पण, एका हल्लेखोराने व्यंकटेशवर वार केल्याने तो जखमी होऊन तेथेच पडला. मैत्रिणीच्या प्रसंगावधानामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

श्वानपथक दीड किलोमीटरपर्यंत धावले. एका शेतात हल्लेखोराची चप्पल जोड मिळाली असून श्वान शेतातून, कच्च्या रस्त्यावरून पुन्हा विजापूर रोडवर आले. हल्लेखोर तेथून पसार झाले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. तिन्ही हल्लेखोर मराठीतून बोलत होते, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेणारा जखमी व्यंकटेश सध्या सुस्थितीत आहे.

जीम करणारा व्यंकटेश तिघांना नडला

नियमित जीम करणारा व्यंकटेश बुधले याने धैर्याने तिन्ही हल्लेखोरांना जोरात विरोध केला. त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. त्यावेळी व्यंकटेशने एकाला घट्ट पकडले तर दुसऱ्याला खाली पाडले. तिसऱ्या चोरट्याने व्यंकटेशच्या मैत्रिणीला पकडून ठेवले होते. पण, आपल्या दोन्ही साथीदारांना नडलेल्या व्यंकटेशला तिसऱ्याने मागून डोक्यात दगड मारला. त्यानंतर हल्लेखोरांनी हातातील हत्याराने व्यंकटेशच्या कपाळावर, दंडावर, मांडीवर, गालावर वार केले. जखमी व्यंकटेश खाली बसल्यावर दागिने घेऊन तिघेही पसार झाले. झटापटीत जखमी झालेल्या हल्लेखोराचेही रक्त मिळाले असून पोलिस त्यानुसार तपास करीत आहेत.

‘सीसीटीव्ही’ची पडताळणी, डम डेटा काढला

घटना ज्याठिकाणी घडली, त्या परिसरात दूरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. पण, एका हॉटेलच्या सीसीटीव्हीत तिघे कैद झाले आहेत, पण त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. याशिवाय पोलिस हल्लेखोर कोठे व कोणत्या मार्गाने जाऊ शकतात, त्या मार्गांवरील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलिस करीत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी घटनास्थळावरील डम डेटा काढला आहे. त्या मोबाईल क्रमांकाच्या ‘सीडीआर’द्वारे देखील तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Uganda Accident: भयंकर! ओव्हरटेक करण्याचा बस चालकाचा प्रयत्न अन्...; भीषण अपघातात ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक गंभीर

Navi Mumbai News: दिवाळीनिमित्त पोलीस सतर्क! सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

Mumbai News: लाखोंच्या शासकीय निधीची अफरातफर, माजी आमदारांविरोधात भाजप आक्रमक; चौकशीची मागणी

Latest Marathi News Live Update : राजदच्या श्वेता सुमन यांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT