पश्चिम महाराष्ट्र

तरुणाच्या त्रासाला कंटाळून मुलीच्या आईची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

सांगली : मुलीचे ठरलेले लग्न दोनवेळा मोडून वारंवार धमकी देणाऱ्या तरूणाच्या त्रासाला कंटाळून एका मुलीच्या आईने (वय 45, खटाव, ता. पलूस) विष पिऊन आत्महत्या केली. या प्रकाराने खटाव परिसरात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, राहुल पाटील (ऐतवडे खुर्द, ता. वाळवा) असे संशयिताचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे भिलवडी पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या दुर्दैवी घटनेतील मुलीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर संबंधित महिला आपला मुलगा, मुलीसह खटाव येथे राहत होत्या. मुलीला शिक्षणासाठी त्यानी भावाकडे ठेवले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलगी नोकरी करीत होती. काही दिवसांपूर्वी मुलीचे लग्न ठरवण्याचा निर्णय व साखरपुडाही झाला. राहुल पाटीलने माहिती मिळताच खोटी माहिती पसरवून तिचे लग्न मोडले. याप्रकारामुळे नातेवाईक चिंतेत होते. राहुलला समजावून सांगूनही तो ऐकत नव्हता.

राहुलच्या त्रासाला कंटाळून नातेवाईकांनी पोलिस अधीक्षकांकडेही तक्रार केली. त्यानंतर राहूलला बोलावून घेतले. तेथे त्याने पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे कबूल केले. परंतू आठवड्यापूर्वीच पुन्हा मुलीचे लग्न ठरल्यानंतर आडकाठी आणून मोडले. दोनवेळा ठरलेले लग्न मोडल्यामुळे मुलीच्या नातेवाईकांना चांगलाच धक्का बसला. तशातच राहुल मुलीची आई आणि ऐतवडे खुर्दमधील त्यांचा भाऊ यांना वारंवार धमकी देत होता. मुलीच्या आईने काल राहुलला अक्षरश: हात जोडून विनवणी केली. तरीही तो ऐकत नव्हता. त्यामुळे त्या प्रचंड तणावात होत्या.
दरम्यान, आज पहाटे मुलीच्या आईने विष प्राशन केले. सहा वाजता त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानंतर मुलगा घाबरला. त्याने शेजाऱ्यांना जागे केले. त्यानंतर तत्काळ त्यांना सांगलीला सिव्हीलमध्ये दाखल केले. पण विष शरीरात भिनले होते. सकाळी दहा वाजता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. सिव्हीलमध्ये नातेवाईक गोळा झाले. दोनवेळा ठरलेले लग्न मोडून धमकी देण्याच्या प्रकारामुळे खचलेल्या या महिलेने आत्महत्या केल्यामुळे ऐतवडे खुर्दमधील तरूणांविरूद्ध संतापाची लाट पसरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT