hari case in sangli zhare sangli marathi news
hari case in sangli zhare sangli marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

जनावरे घरी आली परंतू हरीभाऊ काय नाय आले....

सकाळ वृत्तसेवा

झरे (सांगली) : जांभुळणी तालुका आटपाडी येथील तलावात पाण्यात तरंगत असताना मृतदेह सापडला. आज सकाळी ऊसतोड मजूर तलावामध्ये कपडे धुण्यासाठी गेले असता पाण्यावर तरंगत असलेला मृतदेह त्यांना दिसला त्यानंतर त्यांनी शेजारील गावडे वस्ती व वर नागरिकांना सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की

हरी भगवान गावडे वय वर्ष 48 हे गुरुवारी सकाळी जनावरे चरण्यासाठी रानात गेले होते . सायंकाळी जनावरे घरी आली परंतू हरी गावडे हे घरी आले नाहीत .म्हणून त्यांचे भाऊ जगन्नाथ गावडे यांनी शोधाशोध सुरू केली शुक्रवारीही ही शोधाशोध केली परंतु मयत हरी गावडे कुठे च सापडले नाहीत.

आज शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान ऊस तोड मजूर कपडे धुण्यासाठी  गेले असता पाण्यात काहीतरी तरंगत असल्याचे त्यांना दिसले. त्यांना मृतदेह तरंगत असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी  जवळच असलेल्या गावडे वस्तीवरील लोकांना याची कल्पना दिली. त्यानंतर मयत हरी गावडे यांचे भाऊ जगन्नाथ गावडे यांनी कपड्याच्या कलर वरून मृतदेह ओळखला व हरी गावडे असल्याची खात्री पटली.

तलावावर बघ्यांची गर्दी

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली व जांभुळणी व परिसरातील नागरिकांनी काय प्रकार आहे हे बघण्यासाठी तलावाकडे धाव घेतली. बघता बघता तलावावर बघ्यांची गर्दी वाढली ,पोलीस पाटील, अनिता पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करून पोलीस स्टेशनला फोनवरून याची कल्पना दिली. 

तसेच भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व घटनेची पाहणी केली. व पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन, आरोग्य विभाग यांना फोन वरून सूचना दिल्या.जांभुळणी सोसायटीचे चेअरमन महादेव मासाळ,रावसाहेब गावडे,सरपंच चंद्रकांत पावणे,हरिदास कांबळे,चेअरमन महादेव पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

हरीभाऊंचा परीवार 

मयत हरी गावडे  यांच्या पश्चात आई अनुसया गावडे, भाऊ जगन्नाथ गावडे , मुलगा अजिंक्य व विक्रम असा परिवार आहे. दोघे भाऊ व आई व दोघा भावांची मुले हे सर्व एकत्र  राहतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT