Raju Shetti
Raju Shetti sakal
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : मी तुमच्या उसाची राखण करणारा म्हसोबा..., मला तुमच्या मताचा नैवेद्य द्या; राजू शेट्टींचे भावनिक आवाहन

शिवकुमार पाटील

किल्लेमच्छिंद्रगड - ग्रामीण भागात आपल्या शेतीची राखण करणारा एक म्हसोबा प्रत्येक गावात असतोच, आपण त्याला दरवर्षी खारा अथवा गोड नैवेद्य दरवर्षी दाखवतो. मी देखील तुमच्या उसाचे राखण करणारा म्हसोबाच असून पाच वर्षातून फक्त एकदाच मताचा नैवेद्य दाखवा म्हणजे मी तुमच्या उसाची राखण करतो, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी केली. ते येडेमच्छिंद (ता. वाळवा) येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करताना बोलत होते.

प्रचार शुभारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच संदीप दबडे हे होते. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करून सुरू झालेल्या प्रचार शुभारंभात बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले की, आज खोके घेऊन पक्ष बदलणारे आणि साखर कारखानादार एकत्र येऊन मतदार आणि कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड दबाव आणत असून कार्यकर्त्यांच्या वर खोटे आरोप करून खोट्या केसेस दाखल करीत आहेत. परंतु सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे हे त्यांनी विसरू नये.

  • बावीस वर्षांमधील सहा निवडणुकीसाठी मला मतदारांनी पदरचे पैसे देऊन मतदान केले असून त्यांचा एवढा विश्वास माझ्यावर आहे. मतदारांच्याकडून निवडणुकीसाठी मिळणारी मदत बंद होईल त्यावेळेस मी स्वतःहून निवडणुकीतून माघार घेईन.

  • येणारा शेतकऱ्याकडील पैसा हा पाझर तलावा सारखा असून तो सर्वत्र पाझरत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम शेतकऱ्यांच्या कडून होत असते.

  • शेतकऱ्यांशी जो अडला त्या ठिकाणी राजू शेट्टी नडला हे समीकरण सगळ्यांना माहीत झाले आहे.

  • खासदारकीची निवडणूक माझी स्वतःची नसून आपण सर्वांनी ती आपली म्हणून स्वतःच्या खांद्यावर घेऊन लढवावी लागेल, शेतकऱ्याच्या कामाला दाम मिळावा म्हणूनच मी संसदेचा दरवाजा तिसऱ्यांदा ठोठावत असून मुकी आणि बहिरी असणाऱ्या संसदेला बोलते करण्यासाठीच आपला प्रतिनिधी तिथे आपली बाजू घेऊन भांडणारा असावा हे मतदारांनी लक्षात ठेवावे.

  • माझ्या दहा वर्षाच्या खासदारकीचा हिशोब विचारणारांनी प्रथम संसदेत जाऊन माझ्या कामाची कागदपत्रे बघावीत.

यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालिदर पाटील यांचेसह संघटनेचे मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक आकाश साळुंखे यांनी केले.

वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष भास्करराव कदम यांनी रयत क्रांती संघटनेमधून स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्हा संघटनेकडून राजू शेट्टी यांना जाहीर पाठिंबा. स्वाभिमानी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जयकुमार कोल्हे यांनी एक लाख नऊ हजार रुपये निवडणूक प्रचारासाठी राजू शेट्टी यांच्याकडे दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT