Hazare says Awareness is coming from silence agitation
Hazare says Awareness is coming from silence agitation 
पश्चिम महाराष्ट्र

मौनातूनही होतेय जनजागृती : हजारे 

सकाळ वृत्तसेवा

राळेगणसिद्धी : "कोट्यवधी रुपये खर्चून होणार नाही अशी जनजागृती आणि लोकशिक्षण मौन आंदोलनातून होत आहे,' असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज लेखी संदेशात व्यक्त केले. "निर्भया'च्या गुन्हेगारांना फाशी होईपर्यंत मौन आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केल्याने, त्यांचे मौन आज विसाव्या दिवशी सुरूच होते. 

दरम्यान, मिरजोळी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील दलवाई विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज हजारे यांची भेट घेऊन मौन आंदोलनास पाठिंबा दिला. पारनेर पंचायत समितीच्या उपसभापती सुनंदा धुरपते व महिलांनीही हजारे यांची भेट घेतली. पारनेर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती गणेश शेळके व कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे हजारे यांची भेट घेतली. तसेच, औरंगाबाद येथील अशोक कावळे, पनवेल (रायगड) येथील मिथुन पाटील, निफाड (नाशिक) येथील कैलास कुंटे यांनी व महिलांनी हजारे यांची भेट घेऊन आंदोलनास पाठिंबा दिला. 

अण्णा मौन आंदोलनावर ठाम 

दरम्यान, दिल्लीतील निर्भया अत्याचार व खून प्रकरणातील चारही आरोपींना पतियाळा न्यायालयाने 22 जानेवारी रोजी फाशी देण्याचा निर्णय दिला. मात्र, आपण आताच मौन थांबविणार नाही. निर्भयाच्या आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत आपण मौनावर ठाम असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे. 

आंदोलनाचा 20वा दिवस

विविध मागण्यांसाठी हजारे यांनी 20 डिसेंबर 2019 पासून राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात मौन आंदोलन सुरू केले आहे. या मौन आंदोलनाचा आजचा 19वा दिवस होता. पतियाळा न्यायालयाने निर्भयाच्या आरोपींना 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता फाशी देण्याची शिक्षा जाहीर केली. मात्र, त्यानंतरही अण्णा हजारे आपल्या मौन आंदोलनावर कायम होते. शिक्षेची अंमलबजावणी झाल्यावरच आंदोलन मागे घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

वसतिगृहातील मुलांचा पाठिंबा

अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलनाला संगमनेर येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील मुलांनी पाठिंबा दिला, तसेच दिवसभरात शहापूर, ठाणे, शिरूर व सोलापूर येथील काही कार्यकर्त्यांनी भेट घेऊन हजारे यांच्या मौन आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच, पारनेरमधील अनेकांनी आज हजारे यांची भेट घेतली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT