hd devegowda comment on ad yeddyurappa government 
पश्चिम महाराष्ट्र

येडियुराप्पा सरकार कार्यकाळ पूर्ण करेल 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार आपला कालावधी पूर्ण करेल. मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, अशी आमची अपेक्षा नसून प्रादेशिक पक्षांमुळेच राज्य, देशांचा विकास शक्‍य होतो, असा विश्वास माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांनी बुधवारी (ता. 19) पत्रकार परिषदेत व्यक्‍त केला. 

श्री. देवेगौडा पुढे म्हणाले, ""गेल्या काही वर्षात धजदने अनेक चढउतार पाहिले आहेत. पण, आता पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांची बोट बांधली जात असून तळागळातील कार्यकर्त्यांना संधी देवून संघटनात्मक बांधणी केली जाणार आहे. पक्षातील निष्ठावंतांवरही जबाबदाऱ्या दिल्या जाणार असून राज्यात तसेच देशात धजदला मजबूत पक्ष बनविणार आहे. देशातील राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांची कामगिरी पाहिली आहे. त्यात राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यात विकास साध्य केला आहे. केरळ, तमिळनाडू, आंध्रप्रदेश व दिल्ली आदी राज्ये त्याची उदाहरणे असून संबंधित राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची संघटना भक्‍कम झाली पाहिजेत.'' 

विधान परिषद निवडणुकीत धजदचे आमदार जी. टी. देवगौडा यांनी भाजपला मतदान केल्याची माहिती मिळाली आहे; पण या निवडणुकीसाठी धजदने व्हीप जारी केला नव्हता. जी. टी. देवगौडा हे कॉंग्रेस किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे. परंतु, त्याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. विधान परिषद निवडणुकीत व्हीप जारी करुन आमदारांना बांधून ठेवणे योग्य नाही. त्यासाठी आम्ही व्हीप जारी केला नव्हता, असेही माजी पंतप्रधान देवेगौडा म्हणाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT