burning car in shrigonda 
पश्चिम महाराष्ट्र

पेटलेल्या मोटारीतून त्याने वाचविला पोलिसाचा जीव 

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : रात्रीचे अकरा वाजलेले, समोर मोटार उलटून तिने पेट घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या मोटारीत कुटुंब होते; मात्र सगळे बाजूला ठेवून मोटारीच्या प्रकाशात पेटलेल्या मोटारीत कुणी तरी असल्याचे दिसले आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी अपघातग्रस्त व्यक्तीला पेटत्या मोटारीतून बाहेर काढले. काही अंतर जखमीला उचलून आणले आणि पाठीमागे मोटारीचा स्फोट झाला. 


हा थरार घडला पारगाव सुद्रिक फाटा ते श्रीगोंदे मार्गावर काल (गुरुवारी) रात्री अकरा वाजता. धाडसी युवक होते श्रीगोंद्यातील संतोष बोळगे आणि जखमी झाले होते पोलिस कर्मचारी शैलेंद्र जावळे. 


जावळे काल रात्री अकराच्या सुमारास आपल्या फोर्ड आयकॉन या मोटारीतून (एमएच 01-5470) श्रीगोंद्याहून नगरकडे जात होते. पारगाव फाटा येथील वळणावर जावळे यांचा मोटारीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात जावळे जखमी झाले. रात्रीचा अंधार, त्यात रस्त्यावर वाहतूक कमी असल्याने जावळे यांच्या मदतीला कुणी आले नाही. त्यांची मोटार एलपीजी असल्याने याच दरम्यान गाडीच्या इंजिनने पेट घेतला. काही वेळातच आग आणखी भडकली. 

कुणी तरी असल्याचे दिसले
त्याच दरम्यान नगरहून श्रीगोंद्याकडे जाणाऱ्या संतोष बोळगे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांच्या मोटारीत पत्नी, लहान मुले होते. मात्र, त्यांच्या मोटारीच्या प्रकाशात आग लागलेल्या मोटारीत त्यांना कुणी तरी असल्याचे दिसले. कुटुंबाला धीर देत जिवाची पर्वा न करता ते पेटलेल्या मोटारीकडे धावले.

मोटारीचा स्फोट झाला

त्या मोटारीतून जखमी असलेल्या व्यक्तीला बाहेर काढले आणि काही वेळातच पेटलेल्या मोटारीचा स्फोट झाला. बोळगे यांनी जावळे यांना ओळखले आणि रुग्णवाहिकेला फोन करीत जावळे यांना श्रीगोंदे येथील रुग्णालयात आणले. बोळगे यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Sangli Miraj Kupwad Politics : जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील एकत्र; महायुतीचा गेम! दोन माजी महापौरांना लावले गळाला

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT