पश्चिम महाराष्ट्र

नागवडे कारखान्याच्या हरकतींवर तीन फेब्रुवारीला सुनावणी 

सकाळ वृत्तसेवा

श्रीगोंदे : नागवडे सहकारी साखर कारखान्याने नियमांची अंमलबजावणी केली नाही. मागील पाच वर्षांत सभासदांना अक्रियाशील ठरविण्याबाबत कुठलीही नोटीस दिली नाही. आता थेट मतदारयादीतून वगळले. हा सभासदांवर अन्याय आहे. त्यामुळे मृत वगळता सर्व सभासद मतदानासाठी पात्र करावेत, अशी मागणी कारखान्याचे उपाध्यक्ष केशव मगर यांनी केली आहे. 

हरकतीची शेवटची मुदत 
नागवडे कारखान्याच्या मतदारयादीवर हरकती घेण्याची आज शेवटची मुदत होती. या हरकतींवर आता नगर येथे तीन फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. उपाध्यक्ष मगर यांनीच आज कारखाना प्रशासन चुकीचे वागल्याचा आरोप केला. प्रादेशिक सहसंचालक, नगर यांच्याकडे हरकत नोंदवून तसे पत्रही दिले. 

दहाच सेवा संस्था मतदार 
मगर म्हणाले, ""मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून, तीत 22 हजार 711 पैकी केवळ 9589 सभासदांचीच नावे आली. तसेच "ब' वर्ग सभासद असणाऱ्या 43 पैकी केवळ 10 सेवा संस्था मतदार ठेवल्या आहेत. क्रियाशील व अक्रियाशील सभासदांचे वर्गीकरण 97व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले आहे. कुठलाही सभासद अक्रियाशील होत असल्यास, त्याला दरवर्षी नोटीस देऊन म्हणणे मांडण्यास मुदत दिली जाते. गेल्या पाच वर्षांत कारखाना प्रशासनाने एकाही सभासदाला नोटीस अथवा साधे पत्रही दिलेले नाही.'' 

सभेची उपस्थिती आवश्‍यक 
""पाचपैकी किमान एका वार्षिक सभेला उपस्थित राहणे सभासदांना बंधनकारक असते. मात्र, कारखाना संचालक मंडळाने गैरहजर सभासदांची सामूहिक रजा मंजूर करून तसे सहसंचालकांना कळविले. त्याच वेळी सेवा संस्था प्रतिनिधीचीही गैरहजेरी त्यात आली. मात्र, प्रशासनाने त्याला बगल देत अनाधिकाराने सभांना गैरहजेरी दाखवित 33 संस्था मतदानापासून वंचित ठेवल्या. अशा संस्थांसाठी स्वतंत्र हजेरीपुस्तकच ठेवले नसल्याने, त्यांची हजेरी व गैरहजेरीचा विषयच येत नाही. केवळ 1197 मृत सभासद वगळता, सर्वांना मतदानासाठी पात्र ठरवावेत. शिवाय 43 संस्थांचेही मतदार म्हणून ठराव मागवावेत,'' अशी मागणी मगर यांनी केली. 

हरकतींसाठी मोठी गर्दी 
नागवडे कारखान्याच्या मतदारयादीवर हरकती नोंदविण्यासाठी नगरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. या यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती घेण्यात आल्या आहेत. मगर यांच्यासह घनश्‍याम शेलार, प्रा. तुकाराम दरेकर, अण्णा शेलार, जिजाबापू शिंदे, ऍड. बाळासाहेब काकडे, दीपक भोसले, कैलास पाचपुते, बाळासाहेब पाचपुते आदींसह अनेक सभासदांनीही हरकती नोंदविल्या आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT