Solapur
Solapur 
पश्चिम महाराष्ट्र

दुसऱ्यांदा किडनी निकामी; कुरिअर व्यावसायिकाला हवाय मदतीचा हात 

परशुराम कोकणे

सोलापूर : जुळे सोलापुरातील रहिवासी, कुरिअर व्यावसायिक परेश कुलकर्णी हे दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्रस्त आहेत. पुढच्या आठवड्यात गुजरातमध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्स्प्लांटची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांची बहीण पौर्णिमा हणमंते या आपली एक किडनी भावाला देणार आहेत. या उपचारासाठी जवळपास 10 लाखांचा खर्च आहे. परेश यांना आर्थिक मदत करण्यासाठी सोलापूकरांनी पुढे यावे, असे आवाहन मित्र परिवाराने केले आहे. 

परेश कुलकर्णी यांच्या 2011मध्ये पहिल्यांदा दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळाले. त्या वेळी ते सुमारे 19 महिने अंथरुणावर पडून होते. त्यांच्या आईने एक किडनी दिल्यानंतर 2013 मध्ये पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पाच-सहा वर्षे सर्वकाही व्यवस्थित होते. पण गेल्या काही दिवसांपासून परेश यांना पुन्हा किडनीचा त्रास होऊ लागला. डॉक्‍टरांना दाखविण्यात आले. किडनी व्यवस्थित काम करत नसल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करण्यास सांगितले आहे. 

येत्या 7 जून रोजी गुजरातमधील रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. पुण्यात खासगी कंपनीत नोकरी करणारी त्यांची बहीण पौर्णिमा हणमंते या भावाला किडनी देणार आहेत. या शस्त्रक्रियेसाठी जवळपास 10 लाखांचा खर्च होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून काही मदत मिळणार आहे. नूतन खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींनी पाठपुरावा करण्याचा शब्द दिला आहे. सामाजिक भावनेतून सोलापुरातील अनेकांनी परेश यांना उपचाराकरिता आर्थिक दिली आहे. काहींनी थेट रुग्णालयाच्या खात्यावर मदत पाठविली आहे. कुरिअर व्यावसायिक असलेल्या परेश यांच्या पत्नी खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करायच्या, पण पतीच्या आजारपणामुळे त्यांना सारखं रजा घेणं शक्‍य नव्हतं. त्यामुळे काम सोडावं लागलं आहे. वडील पद्माकर कुलकर्णी निवृत्त शिक्षक आहेत. 

गेल्या सहा वर्षांपासून परेश हे सामाजिक भूमिकेतून किडनीच्या रुग्णांना उपचाराच्या अनुषंगाने मार्गदर्शन करीत आहेत. अनेकदा चुकीची माहिती मिळाल्याने रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांची अडचण वाढते. परेश यांना मदत करण्यासाठी 7066844787 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

परेश याच्यावर 2013 मध्ये पहिल्यांदा किडनी ट्रान्स्प्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. सामाजिक भूमिकेतून किडनीच्या रुग्णांना तो मार्गदर्शन करत असतो. परेशची परिस्थिती बिकट आहे. आम्ही मित्रांनी शक्‍य तितकी मदत केली आहे. आता सोलापूरकरांनीही मदतीसाठी पुढे यावे. 
- अभय जहागीरदार, परेश यांचे मित्र 

आयुष्यात कोणाला कधी अडचण येईल, हे सांगता येत नाही. माझा भाऊ परेश याला मी माझी एक किडनी देणार आहे. अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकांनी अवयवदानासाठी पुढे यावे. सर्वांत म्हणजे स्वत:चे आरोग्य निरोगी राहील याकडे लक्ष द्यावे. 
- पौर्णिमा हणमंते, परेश यांच्या बहीण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT