With the help of the Vikhe group, NCP defeated the BJP 
पश्चिम महाराष्ट्र

विखे गटाच्या मदतीने भाजपला धोबीपछाड

संजय आ. काटे

श्रीगोंदे : पंचायत समितीच्या सभापतिपदी गीतांजली पाडळे व उपसभापतिपदी रजनी देशमुख यांची आज निवड झाली. दोघीही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्य आहेत. बहुमत असतानाही एक सदस्य अपात्र झाला आणि दुसरा फुटल्याने भाजपला पंचायत समितीची सत्ता आज गमवावी लागली. माजी आमदार राहुल जगताप यांची जादू चालली. त्यांनी विखे पाटील गटाच्या सदस्यांना सोबत घेत भाजपच्या हातून सत्ता हिसकावली. 

श्रीगोंदे पंचायत समितीत भाजपचे सात, तर दोन्ही कॉंग्रेसचे पाच सदस्य होते. तथापि, सभापती- उपसभापती निवडणुकीपूर्वी भाजपचे काष्टी गणातील सदस्य अमोल पवार यांना जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याप्रकरणी अपात्र ठरविण्यात आले. काष्टी येथील कार्यकर्ते विक्रम पाचपुते यांनी त्यांची केलेली तक्रार आज विरोधकांच्या पथ्यावर पडली. भाजपच्या भानगाव गणातील सदस्य आशा गोरे काही दिवसांपूर्वीच "राष्ट्रवादी'च्या गोटात गेल्याने भाजपला धक्का बसला. गोरे यांचे पती सुरेश गोरे बाबासाहेब भोस यांना मानतात. 

पाचपुते यांच्या विरोधात एकी कायम

माजी आमदार जगताप यांनी नियोजनबद्ध खेळी करीत आज भाजपच्या हातातील सत्ता हिसकावली. सभापती व उपसभापती निवडीत "राष्ट्रवादी'च्या बाजूने सहा आणि विरोधी भाजपला पाच मते मिळाली. जगताप यांना विखे गटाची मोठी मदत झाली. रजनी देशमुख यांचे पती सिद्धेश्वर देशमुख विखे पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत. विखे गटाचेच सदस्य अण्णा शेलार यांनी जगताप यांच्या मदतीने भाजपकडून सत्ता काढून घेताना, एक प्रकारे विखे गटाचीच मदत घेतल्याने, श्रीगोंद्यात भविष्यात आमदार बबनराव पाचपुते यांच्या विरोधात ही एकी कायम राहील असे संकेत मिळाले. 

निवडीनंतर नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार झाला. जगताप यांच्यासह घनश्‍याम शेलार, अण्णा शेलार, बाबासाहेब भोस, शिवसेनेचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब गोरे, केशव मगर, दीपक भोसले, हरिदास शिर्के, सुरेश लोखंडे उपस्थित होते. 

"व्हीप'चा गोंधळ 
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पहिलीच वेळ असलेल्या प्रांताधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी अतिशय शांतपणे निवडप्रक्रिया हाताळली. भाजपचा गटनेता अपात्र ठरल्याने शहाजी हिरवे यांची नवा गटनेता म्हणून निवड झाली असून, मतदानाबाबतचा "व्हीप' सदस्य गोरे यांना तेथेच बजावण्याचा प्रयत्न झाला. मात्र गोरे यांनी तो नाकारला. त्यानंतर नऱ्हे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय महिला संघाची 'ती' कृती अन् R Ashwin ने पुरुषांच्या संघाचे काढले वाभाडे; म्हणाला, ते फक्त प्रसिद्धीसाठी बाता मारतात, पण..

Pune News: पुणे जिल्ह्यात भीतीचा अंत! शिरूरमधील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Akkalkot News: 'अक्कलकोट तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींना मिळणार स्वतंत्र इमारत'; एक कोटी पाच लाख निधी मंजूर; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा पुढाकार

Mumbai News : हाताला मेहंदी लावली म्हणून विद्यार्थीनीला वर्गातून बाहेर काढलं, पालकांची शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार....

SCROLL FOR NEXT