The highest number of malnourished people in Belgaum district
The highest number of malnourished people in Belgaum district 
पश्चिम महाराष्ट्र

कुपोषणः बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक कुपोषितांची संख्या

महेश काशीद

बेळगाव ः सरकार दरवर्षी मातृपूर्ण, मध्यान्ह आहार आणि पौष्टीक आहारावर कोट्यवधी रुपये खर्च करते, तरीही जिल्ह्यात सध्या सर्वाधिक कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. यामुळे कुपोषित बालकांचा आकडा 68 हजार 962 इतका झाला आहे. तर महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांच्या जिल्ह्यात कुपोषित बालकांचा टक्का वाढल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. 

राज्यात पाच लाख कुपोषित बालके असल्याची नोंद महिला व बाल कल्याण विभागाकडे झाली असून त्यापैकी 185 बालके लॉकडाउनच्या काळातील दोन महिन्यात दगावली आहेत. महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले बेळगाव जिल्ह्यातील असूनही जिल्ह्यातील कुपोषितांची वाढलेली संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे सर्व पातळीवरच्या अभ्यासाचा अभाव असल्याचे मत तज्ज्ञाकडून व्यक्‍त केले जाते. 

कोरोनाने देशपातळीर थैमान घातल्याने आरोग्य विभागाकडून कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. मातृपूर्ण, वैद्यकीय आणि पौष्टीक आहार पुरवठ्यात मर्यादा आल्यामुळेही कुपोषितांच्या संख्येत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

पुन्हा नियोजन सुरु
लॉकडाउनमुळे वैद्यकीय तपासणी, वजन करणे आणि अन्य बाबींची पूर्तता करताना मर्यादा पडल्या आहेत. मात्र आता पुन्हा नियोजन सुरु आहे. 
के. ए. दयानंद, 
संचालक, महिला व बालकल्याण 

कुपोषित बालकांची जिल्हानिहाय आकडेवारी 

 
जिल्हा संख्या 
बेळगाव 68,962
हावेरी 26,198 
चित्रदूर्ग 13,375
कोलार 4,500
बिदर 27,921 
बळ्ळारी 45,196 
चामराजनगर 5,798 
म्हैसूर 12,649 
कोडगू 1,798 
उडपी 1,850 
मंड्या 5,022 
विजापूर 26,842 
दावणगेरी 11,679 
यादगिरी 23,097 
बागलकोट 26,609 
गदग 18,439 
हासन 1,983 
तुमकूर 10,344 
बंगळूर नगर 12,599 
चिक्कमगळूर 4,128 
बंगळूर ग्रामीण 1,111
गुलबर्गा 29.144 
कारवार 7,134 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT