पश्चिम महाराष्ट्र

राज्यात सर्वाधिक पेन्शन घेणारे आमदार... कोण आहे बरं?

तात्या लांडगे

सोलापूर : सांगोला (जि. सोलापूर) येथील माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी राज्याच्या राजकारणात 51 वर्षे आमदारकी भोगली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतून त्यांनी स्वत:हून माघार घेतली. गणपतराव देशमुख यांना पहिल्या पाच वर्षांसाठी महिन्याला 50 हजार रुपये तर आमदारकीच्या पुढील प्रत्येक वर्षासाठी दोन हजारांप्रमाणे 92 हजार अशी एकूण एक लाख 42 हजार रुपयांची दरमहा पेन्शन मिळणार आहे. सर्वाधिक पेन्शन घेणारे ते राज्यातील पहिले आमदार ठरणार आहेत. मात्र, त्यांना अद्यापही पेन्शनचा लाभ मिळालेला नाही. 

माजी आमदारांना राज्याच्या तिजोरीतून पेन्शन दिली जाते. पहिल्या पाच वर्षांसाठी दरमहा 50 हजार रुपये तर त्यानंतरच्या आमदारकीच्या प्रत्येक एका वर्षासाठी दोन हजारांप्रमाणे वाढ केली जाते. राज्यातील 789 माजी आमदारांना पेन्शनपोटी दरवर्षी 65 कोटी 27 लाख 60 हजार रुपये वितरीत होतात. सद्यस्थितीत पेन्शन योजनेसाठी किती आमदार नव्याने पात्र झाले आहेत, एकूण किती रक्‍कम या योजनेसाठी खर्च होते, याची माहिती संकलनाचे काम सुरु असल्याचे वित्त विभागाचे सचिव राजीव मित्तल यांनी सांगितले. 

राज्याच्या डोक्‍यावरील कर्जाचा डोंगर अन्‌ त्यातून भरावे लागणारे व्याज, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च आणि सरकारला दरवर्षी मिळणाऱ्या उत्पन्नाची अपडेट माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वित्त विभागाकडून मागविली आहे. मार्च 2020 मध्ये (राज्याच्या बजेटपूर्वी) श्‍वेतपत्रिका काढण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात सध्या माजी आमदारांमध्ये 50 ते 60 हजारांपर्यंत पेन्शन घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार ठरलेल्यांना अद्याप पेन्शनचा लाभ मिळाला नसून त्यांच्यासाठी आगामी बजेटमध्ये वाढीव तरतूद केली जाईल, असे नियोजन असल्याचेही वित्त विभागातील सूत्रांनी सांगितले. 

ठळक बाबी... 

  • राज्य सरकारच्या खांद्यावर 6.71 लाख कोटींच्या कर्जाचा बोजा 
  • राज्यातील 789 माजी आमदारांना पेन्शन योजनेचा मिळतोय लाभ 
  • माजी आमदार पेन्शन योजनेसाठी दरवर्षी सरासरी 65 कोटींचा खर्च 
  • राज्य सरकारने वित्त विभागामार्फत मागविली सद्यस्थितीची माहिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT