nrc and cca andolan 
पश्चिम महाराष्ट्र

सीएए विरोधकांना भिडणार हिंदू राष्ट्र सेना 

सकाळ वृत्तसेवा

नगर: सीएए व एनआरसी कायद्यास विरोध करण्यासाठी नगर शहरात उद्या (सोमवारी) सभा घेतली जाणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड येणार आहेत. मात्र, या सभेस हिंदू राष्ट्र सेनेने विरोध दर्शवला आहे. सभास्थानी जाऊन ते विरोध करणार आहेत. त्यासाठी त्यांनी रणनीती आखली आहे. तसे झाल्यास सभास्थानी राडा होण्याची शक्‍यता आहे. 

हा तर देशद्रोह 
सभेस विरोध करण्यासाठी सभास्थानी जाण्याचा इशारा हिंदूराष्ट्र सेनेने दिला आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी दिली. केंद्र सरकारने हे कायदे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मांडून पारित केले आहेत. त्यावेळी सर्वपक्षीयांनी या कायद्यांबाबत चर्चा केली आहे. चर्चेअंतीच कायदे पारित झाले आहेत. अशावेळी या कायद्यांना विरोध करणे हा देशद्रोच आहे. देशद्रोही सभा घेण्यास मूळातच प्रशासनाने परवानगी का दिली, असा सवाल त्यांनी केला आहे. या सभेस प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी भूमिका हिंदूराष्ट्र सेनेने घेतली आहे. 

कायदा हिताचाच 
भारताबाहेर राहणाऱ्या मूळ भारतीयांना भारतामध्ये संरक्षण देण्याची आवश्‍यकता आहे. ते रहात असलेल्या देशांमध्ये त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. त्यामुळेच संसदेने हा कायदा मंजूर केला. या कायद्यास जाहीर विरोध करून त्याकरिता सभेचे आयोजन करण्यास हिंदूराष्ट्र सेनेचा विरोध आहे. 

माळीवाड्यात जमणार 
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी उद्या (सोमवारी) सकाळी 11 वाजता माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी कार्यालयावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. 
यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असतील. तसेच सभेस विरोध करण्यासाठी कार्यकर्ते सभास्थळीही जातील. दरम्यान, हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हिंदूराष्ट्र सेनेने घेतलेल्या या भूमिकेस वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT