Sambhaji Bhide Google
पश्चिम महाराष्ट्र

हिंदुस्तान म्हणजे देशभक्तीचा स्वत्व नसलेला देश; संभाजी भिडे

बलराज पवार

सांगली : प्रदीर्घ काळ पारतंत्र्यात राहिलेल्या आणि देशभक्तीचा स्वत्व नसलेल्या लोकांचा देश म्हणजे हिंदुस्तान असल्याची जळजळीत टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (Sambhaji Bhide) यांनी आज केली.

सांगलीत (Sangli) दसरा (Dasara) निमित्त दुर्गामाता दौडीच्या समारोपावेळी ते बोलत होते. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने गेली दोन वर्षे शिवप्रतिष्ठानला दुर्गा माता दौड काढण्यास परवानगी नाकारली आहे. केवळ आरती करण्यास परवानगी दिली होती. यावेळी बोलताना संभाजीराव भिडे यांनी राज्यकर्त्यांवरही टीका केली. ते म्हणाले, आपले कोण, परके कोण, योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव एकाही माणसाला नाही. उदात्त अंतकरणाने राज्य करणारा राज्यकर्ता आपल्याला मिळत नाही. या देशात देशभक्तीचा, स्वातंत्र्याचा, आपण कोण आहोत. या जाणिवेचा प्राण नाही. या देशात कसले सरकार आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 कोरोना येतो हे थोतांड आहे. कोरोना हा काल्पनिक आहे. तो ना स्त्री, ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसांना होणारा रोग आहे.  चीनने तुम्हाला, आम्हाला पालथं पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांच्या अंतःकरणात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वसत असते तर ते देशाचे नेतृत्व करणारे ठरले असते, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT