His stay in jail 
पश्चिम महाराष्ट्र

आता यांचा मुक्काम जेलमध्ये 

सूर्यकांत वरकड

नगर : जिल्ह्यातील श्रीरामपूर, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदे तालुक्‍यांतील पाच अट्टल गुन्हेगांराविरुद्ध जिल्हा पोलिस अधीक्षकांनी "एमपीडीए'अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने त्या सराईत गुन्हेगारांना अटक करून एक वर्षासाठी नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले आहे. 

प्रशांत ऊर्फ पांड्या साईनाथ लेकुरवाळे (वय 23, रा. निमगाव खैरी, श्रीरामपूर), गणेश ऊर्फ सोमनाथ बापूसाहेब हाळनोर (वय 25, रा. फत्त्याबाद, ता. श्रीरामपूर), कमलेश दिलीप डेरे (वय 23, रा. डेरेवाडी, धांदरफळ, ता. संगमनेर), संतोष राघू शिंदे (वय 40, रा. राजापूर, ता. श्रीगोंदे), राजू ऊर्फ राजेंद्र भाऊ गागरे (वय 40, रा. मांडवे खुर्द, ता. पारनेर), अशी आरोपींची नावे आहेत.

नगर : "एमपीडीए'अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींसह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी. 

तत्कालीन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा आणि ईशू सिंधू यांनी संघटित गुन्हेगारी करणारे वाळूचोर, रस्तालूट, जबरी चोरी, अशा स्वरूपाच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळूचोर अशा व्यक्तींना आळा घालण्यासंबंधीच्या कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई सुरू केली. आतापर्यंत वाळूचोरीच्या गुन्ह्यातील अनेकांवर "एमपीडीए'अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

तत्कालीन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी वरील पाच आरोपींविरुद्ध "एमपीडीए'चा प्रस्ताव जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी सर्व कायदेशीर बाबी पडताळून त्यास काल मंजुरी दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी वरील आरोपींना विविध ठिकाणांवरून ताब्यात घेतले. त्यांची मंगळवारपासून (ता. 24) एक वर्षासाठी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई सहायक फौजदार मधुकर शिंदे, सोन्याबापू नाणेकर, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, किरण जाधव, सूरज वाबळे, विजय वेठेकर, मनोज गोसावी, बबन मखरे, दत्ता गव्हाणे, विशाल दळवी, विजय ठोंबरे यांच्या पथकाने केली. 

आरोपींविरुद्ध दाखल गुन्हे 
प्रशांत लेकुरवाळे याच्याविरुद्ध कोपरगाव, नारायणगाव, श्रीरामपूर पोलिस ठाण्यांत दरोडा, मारहाण, दरोड्याची तयारी, असे सात गुन्हे दाखल आहेत. गणेश हाळनोर याच्याविरुद्ध राहुरी, लोणी, श्रीरामपूर, पोलिस ठाण्यांत चोरी, सरकारी कामात अडथळा, शस्त्र बाळगणे, असे पाच गुन्हे दाखल आहेत. कमलेश डेरे याच्याविरुद्ध संगमनेर पोलिस ठाण्यात चोरी, दमदाटी, असे सहा गुन्हे दाखल आहेत. राजू गागरे याच्याविरुद्ध वाळूचोरीचे गुन्हे दाखल आहेत. संतोष शिंदे याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, चोरी, असे गुन्हे दाखल आहेत. 

आतापर्यंत वीस जण स्थानबद्ध 
वाळूचोरी, रस्तालूट, जबरी चोरी, अशा गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सराईत गुन्हेगारांवर "एमपीडीए'अंतर्गत कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 20 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अजूनही काही प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. 
- दिलीप पवार, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा 

वर्षनिहाय स्थानबद्धतेची कारवाई 
2018 - 3 
2019 - 17 
प्रलंबित - 10 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT