सातारा - हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्यास सुरवात झाली आहे. त्याची पाहणी करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे आदी.
सातारा - हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्यास सुरवात झाली आहे. त्याची पाहणी करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे आदी. 
पश्चिम महाराष्ट्र

हायसिक्‍युरिटी नंबरप्लेटची अंमलबजावणी

सकाळवृत्तसेवा

सातारा - शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात काही कंपन्यांनी हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे वाहनांची सुरक्षितता वाढणार आहे. दुचाकी वाहनांबाबतही याची तातडीने अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे.

केंद्र शासनाच्या मोटार वाहन कायद्यात २००० मध्ये अधिनियम ५० अंतर्गत देशातील सर्व गाड्यांना सुरक्षितता प्राप्त होण्यासाठी हाय सिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, कायदा संमत होऊनही राज्यांनी त्याची अंमलबजावणी केली नव्हती. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विचारणा केली होती. त्यानंतर राज्य शासनाने प्रतिज्ञापत्र सादर करत याबाबतची निविदा काढणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर एप्रिल महिन्यापासून तयार होणाऱ्या सर्व वाहनांना हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले. या निर्णयामुळे गाड्यांच्या नंबरप्लेटला पर्यायाने गाड्यांना सुरक्षितता मिळणार आहे. यामुळे चार प्रकारांत गाडीच्या क्रमांकाची शहानिशा करता येणे शक्‍य होणार आहे. त्यात प्रामुख्याने प्लेटवर क्रोमिअम संकेतचिन्ह (हॉलोग्राम) लावण्यात येणार आहे; तसेच गाडी क्रमांकाची नोंदणी सुरक्षा ‘स्टीकर’सह काचेच्या डाव्या बाजूला लावून करण्यात येणार होती.

दुचाकीत मात्र स्टीकर लागणार नव्हते. गाडीच्या पुढे आणि मागे असणारी नंबरप्लेट ‘स्नॅप लॉक’ यंत्रणेद्वारे सुरक्षित करण्यात येईल. यामुळे चोरांनी गाडी पळविल्यावर प्लेट काढण्याचा प्रयत्न केल्यास तिचे दोन तुकडे पडतील, अशी यात तजवीज असणार होती.

एप्रिलपासून या नंबरप्लेट बंधनकारक असल्या तरी, बहुतांश गाड्या विक्रेत्यांकडे एक एप्रिलपूर्वी तयार केलेल्या गाड्याच उपलब्ध होत्या. त्यामुळे संबंधित डीलरनी हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट बसविण्यास सुरवात केली नव्हती. आता मात्र, मारुती व होंडा कंपन्यांकडे एप्रिलनंतर तयार झालेल्या गाड्या आलेल्या आहेत. त्यामुळे या वाहनांना हायसिक्‍युरिटी नंबरप्लेट डीलरकडूनच बसवून दिल्या जात आहेत. परिणामी या वाहनांची सुरक्षितता वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT