Historic Fort Of Chhatrapati Shivaji Maharaj Era Must Read Kolhapur Marathi News
Historic Fort Of Chhatrapati Shivaji Maharaj Era Must Read Kolhapur Marathi News 
पश्चिम महाराष्ट्र

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना भेट दयायची आहे मग हे वाचा....

प्रवीण कुलकर्णी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील गडकोट किल्ले म्हणजे नुसते दगड-मातींचे डोंगर नाहीत. छत्रपती शिवरायांचे सर्वांत मोठे बलस्थान आणि सच्चे सवंगडीच होते, असे मनोमन वाटते. या सवंगड्यांना अनुभवण्यासाठीच सह्याद्रीत वारंवार भटकंतीचा उद्योग करावा लागतो. आज चढाईसाठी अत्यंत अवघड अशा पहिल्या दहा किल्ल्यांमधील एक कलावंतीण दुर्गचा थरार आपण अनुभवणार आहोत. 


जुन्या मुंबई-पुणे एक्‍स्प्रेस वेवरून जाताना माथेरानच्या हिरव्यागार डोंगररांगांत आभाळात गेलेला उंच सुळका दिसतो, तोच कलावंतीण दुर्ग. कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड सख्खे शेजारी. बहामनीकालीन हा उत्तर कोकणातील प्रबळगड पनवेल आणि कल्याण बंदरांवर लक्ष ठेवण्यासाठी असावा. दोन हजार ३०० फूट उंच आणि डोंगरी किल्ला श्रेणीत मोडणाऱ्या ‘कलावंतीण’ला जाण्यासाठी ठाकूरवाडी गाठावे लागते. पनवेल बसस्थानकावरून ठाकूरवाडीसाठी बससेवा आहे. 


प्रबळगडाच्या मार्गाला जाताना...
१४ किलोमीटरचा प्रवास करून अंगणात आणि घराच्या कुडाच्या भिंतीवर चुन्याने रंगविलेली चित्रे पाहतच आपण कलावंतीण, प्रबळगडाच्या मार्गाला लागतो. दाट झाडी... सुखावणारी गार वाऱ्याची झुळूक अन्‌ खाचखळग्यांचा लाल मातीचा रस्ता. ठाकूरवाडीपासून दोन-अडीच तासांच्या पायपिटीनंतर प्रबळमाचीत येऊन पोचतो. प्रबळमाचीत जेवण, राहण्यासाठीचीही व्यवस्था आहे. प्रबळमाचीजवळ खिंड दिसते. त्याच्या डाव्या बाजूला कलावंतीणीचा सुळका आणि उजव्या बाजूला मुरंजनचा डोंगर अर्थात प्रबळगड. 


सह्याद्रीच्या रौद्ररूपाचे दर्शन....
अंगावर येणाऱ्या खड्या फुटा-दोन फुटांच्या ओबडधोबड पायऱ्या, कोरलेल्या पायऱ्या, काही ठिकाणी कच्ची पायवाट, तर काही ठिकाणी प्रस्तरारोहण करीतच ‘कलावंतीण’कडे जावे लागते. डोंगराच्या मध्यावरून, तर कधी कडेने जाणारी एकेरी वाट आणि दोन्ही बाजूंना आधारासाठी काहीही नाही, अशा असह्य वाटेचा थरार अनुभवता येतो. मागे अक्राळविक्राळ दरी, पोटात गोळा आणणारी खोली... हे पाहिले की सह्याद्रीच्या रौद्ररूपाचे दर्शन होते. अत्यंत सावध पावले टाकूनच वर जाणे इष्ट. वर ४० ते ५० लोक उभे राहू शकतील अशी बुरुजासारखी जागा आहे. 


 शिवरायांच्या  २३ किल्ल्यापैकी एक
तेथून सह्याद्रीच्या लहान-मोठ्या डोंगररांगा तसेच समोर प्रबळगडचा माथा दिसतो. उंचीवर चढाईची भीती वाटणाऱ्यांनी इकडे फिरकू नये, हेच खरे. खिंडीच्या डाव्या बाजूला कलावंतीण आणि उजव्या बाजूला प्रबळगड आहे. पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांनी जे २३ किल्ले दिले होते, त्यात प्रबळगडचा समावेश होता. प्रबळगड म्हणजे पूर्णपणे पठारी प्रदेश आहे. कारवीचे माजलेले जंगल आणि मानवी वावर कमी असल्याने भकासपणा जाणवतो. 


 मग मोहिमेला निघाच...
गणेश मंदिर, पाण्याच्या तीन-चार टाक्‍या तसेच चार पडक्‍या इमारतींचे अवशेष वर आहेत. या किल्ल्यावरून मुंबई तसेच पूर्वेला उल्हास, तर दक्षिणेला वाहणारी पाताळगंगा नदी दिसते. माथेरानच्या डोंगररांगा, पेबचा किल्ला, ईर्शाळगड आणि चांदेरी किल्ल्याचे दर्शन येथून होते. हे पाहण्यासाठी जसा वाटाड्या आवश्‍यक आहे, तशी अंगात धमकही. कलावंतीण, प्रबळगडाच्या निमित्ताने सह्याद्रीचे रौद्र रूप अनुभवण्यासाठी दोन दिवस पुरेसे आहेत. मग तातडीने मोहिमेला निघाच..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "केजरीवालांना स्वतंत्र कोठडी अन् साधा कूलरही नाही"; आतिषी यांचा राज्यपालांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray: फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीनं उद्धव ठाकरेंकडं भेटीसाठी मागितली वेळ?; निकालापूर्वीच मोठी घडामोड

Pune Lok Sabha Election Results : कोरेगाव पार्क परिसरात उद्या वाहतुकीत बदल; कोणते आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या..

Hardik Pandya Natasa Stankovic : ट्रोलिंगवर सहानभुतीचा उतारा.. हार्दिकनं मुद्दाम पसरवली घटस्फोटाची अफवा?

Uddhav Thackeray: ...तर ते CCTV फुटेज बाहेर काढावे लागेल, उद्धव ठाकरेंवरील आरोपाने राजकारण ढवळून निघणार

SCROLL FOR NEXT