The hospital was decorated by the father when the daughter was born 
पश्चिम महाराष्ट्र

Video : शिर्डीत जन्मल्या जुळ्या मुली...मग पित्याने उचललं हे पाऊल

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः प्रत्येक राज्यात आज लग्नासाठी मुलीच नाहीत. त्यामुळे हरियाणासारख्या राज्यात अनेक तरूणांना अविवाहित रहावे लागत आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी ही स्थिती आहे. केवळ स्त्री भ्रूण हत्या होत असल्यानेच या सामाजिक स्थितीला सामोरे जावं लागत आहे. जेवढा समाज प्रगत तेवढे मुलींच्या हत्येचे प्रमाण मोठे, हा समाजशास्त्रज्ञांचा निष्कर्ष आहे.

आदिवासी समजल्या जाणाऱ्या समाजात मात्र, ही स्थिती नाही. काही शिकले सवरलेले लोक मुलींचा चांगल्या प्रकारे सांभाळ करतात. घरात मुलगी जन्मली तर तिचे थाटात स्वागतही केले जाते. काहीजण वरात काढतात. काहींनी तर हत्तीवरून साखर वाटल्याच्याही बातम्या येतात, असं विरोधाभासी वातावरण सध्या आहे.

शिर्डीतही तसंच घडलं. लग्नानंतर 12 वर्षांनी शिर्डीतील कोते दाम्पत्याला अपत्य झालं. मात्र, त्या जुळ्या मुली होत्या. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. अपत्य जन्माचा आनंद द्विगुणित झाल्याने तो साजराही तसाच केला. या आनंदात केवळ हॊस्पिटलधील वार्डच नव्हे तर अवघ्या हॉस्पिटलला सजवलं. अनोख्या पद्धतीन कोते दाम्पत्य आणि मित्र परिवाराने स्त्री जन्माचं स्वागत केलय.

बिपीन आणि नीलिमा कोते हे दांम्पत्य गेल्या १२ वर्षापासुन नवीन पाहुण्याच्या आगमनाची वाट पाहात होते आणि तो दिवस उजाडला....नीलिमा यांनी जुळ्या मुलींना जन्म दिला. या जुळ्या मुलींच्या स्वागतासाठी कोते यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये मुलींचा जन्म झाला त्या हॉस्पीटलचा प्रत्येक वॉर्ड , जिना फुलांनी आणि फुग्यांनी सजवुन टाकला. एवढच नाही तर हॉस्पिटलला विद्युत रोषणाईने सजवलं. कोते कुटूंबीय हे साईबाबांचे निस्सीम भक्त दर गुरुवारी निघणाऱ्या साईबाबांच्या पालखीचा मान या कुटूंबास आहे.
 

स्त्री जन्माचं असंही स्वागत

विवाहानंतर तब्बल बारा वर्षांनी पहिलच अपत्य झाल्याने कोते कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी संपूर्ण हॉस्पीटलच सजवून टाकलं. मुलगा असो नाही तर मुलगी हे दोन्ही देवाचा प्रसाद आहे. त्यामुळे तो आनंदाने स्वीकारला पाहिजे, असेही या कोते दाम्पत्याचं म्हणणं आहे. साईबाबांच्या कृपाशीर्वादानेच आम्हाला जुळ्या मुली झाल्या, असं त्यांना वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

INDIA A SQUAD FOR ODI SERIES vs SOUTH AFRICA A : रोहित शर्मा, विराट कोहली यांचा वन डे संघात समावेश नाही; तिलक वर्माकडे नेतृत्व, तर ऋतुराज उप कर्णधार...

Mhada Lottery: पुण्यात ९० लाखांचे घर फक्त २८ लाखांत मिळणार! म्हाडाची मोठी घोषणा; अर्ज कधी आणि कसा करायचा?

Jalgaon News : जळगावकरांची प्रतीक्षा वाढली; अवकाळी पावसामुळे ई-बस आगाराचे काम रखडले, नवीन वर्षातच बससेवा सुरू होणार

Latest Marathi News Live Update : रेशनवर मिळालेले खराब धान्य शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना दाखवले

SCROLL FOR NEXT