sangli sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli : गृहिणींचे कोलमडले आर्थिक बजेट

गॅस, भाजीपाला महागला; सर्वसामान्यांचे जगणे झाले अवघड

हिंम्मतराव नायकवडी

बिळाशी : सध्या सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाईने शहरी भागात राहणाऱ्यांसह विशेषतः ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडल्याने त्यांचे जगणेच अवघड झाले आहे. खाद्यतेल, भाजीपाला, डाळी,पेट्रोल-डिझेल बरोबरच घरगुती गॅसही खूप महागला असल्याने सर्वसामान्यांनी जगायचे कसे? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

गेल्या वर्षापासून अनेक नागरिक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कोरोना कार्यकाळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. व्यवसायावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झाले आहेत, काहींचे व्यवसायही बंद पडले आहेत. त्यातच सातत्याने वाढती महागाई आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवनाशी खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागत आहे. सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी महागाईच्या खाईतच लोटत आहे. घरगुती गॅस जवळपास हजारांच्या घरात पोहोचला आहे.

त्यातच गॅस एजन्सी धारकांनी नेमलेले वितरक गॅस घरपोच सेवेच्या नावाखाली गॅस रकमेपेक्षा आगाऊ रक्कमही ग्राहकांकडून घेत आहेत. महागाईने महिला वर्गातून विशेषतः तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. कडाडलेले भाजी-पाल्यांचे दर सर्व सामानान्यांना न परवडणारे असल्याने सामान्य विशेषतः आहारात डाळींचा वापर करत असतात. परंतु गरिबांच्या ताटातील डाळही १०० ते १२० रुपयांपर्यंत महागल्याने त्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. त्यात कोरोनाने अनेक कुटुंबीयांची उत्पादनाची साधनेच बंद पडल्याने सामान्यांची हाल अपेष्टा होत असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT