How administration allow MLAs to spend funds on public works?  
पश्चिम महाराष्ट्र

आमदारांना निधी खर्चाची मुभा कशी? यांचा आहे सवाल

सकाळन्यूजनेटवर्क

सांगली : कोरोना संकट काळात जिल्हा परिषदेच्या सदस्यांची बहुतांश विकासकामे थांबली आहेत. जिल्हा नियोजनमधील निधीही थांबवला आहे. असे असताना आमदारांना मात्र 25-15 योजनेतील कामे करण्यास मंजूरी आणि त्याचे कार्यारंभ आदेश दिले गेलेत. ही मुभा कशासाठी दिली, असा सवाल जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र पाटील आणि सुरेंद्र वाळवेकर यांनी केला आहे. हा जिल्हा परिषद सदस्यांवर अन्याय असल्याची भावना त्यांनी "सकाळ' शी बोलताना व्यक्त केली. 

ते म्हणाले,""जिल्हा परिषद सदस्यांचे जिल्हा नियोजनमधील बांधकामांचे सुमारे पाच कोटी रुपये, आरोग्य विभागाचे सुमारे 2 कोटी 80 लाखांचे काम होते. ते थांबवण्यात आले. आमदार, खासदार निधीतील अन्य कामे थांबली आहेत. राज्य सरकार संकटात आहे, हे मान्य. त्यासाठी निधी परत मागवला, तो कोरोना उपाययोजनांवर खर्च केला जातोय, हेही कबूल. परंतू, अशावेळी आमदारांनी सूचवलेली 25-15 योजनेतील सुमारे 39 कोटींची कामे करण्यास मात्र थेट मान्यता दिली जाते. आता या काळात कार्यारंभ आदेश दिला जातो, हे गंभीर आहे.'' 

ते म्हणाले,""आमदारांनी सूचवलेली 25-15 योजनेतील 347 कामे आहेत. त्याला 35 कोटी 44 लाखांचा निधी आहे. वाळवा आणि मिरज तालुक्‍याती मार्चमध्ये आराखडा केलेली 4 कोटीची कामे आहेत. त्यांची निविदा ग्रामपंचायत पातळीवर केली जावी, असा कायदा सांगतो. याआधी साऱ्या निविदा जिल्हा परिषदेतच काढल्या जात होत्या. आता सीईओ म्हणून चंद्रकांत गुडेवार यांनी पदभार स्विकारला आहे. त्यांचा कायदेशीर अडथळा टाळण्यासाठी ग्रामपंचायतीकडे पैसे वर्ग करण्याची हुशारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सदस्यांना बगल देऊन आमदारांनी नेहमीच भूमिका रेटल्या. यावेळीही तेच चित्र दिसत आहे.'' 

स्वतंत्र शुद्धीपत्रक 

जितेंद्र पाटील व सुरेंद्र वाळवेकर म्हणाले,""ही कामे करता यावीत म्हणून आमदारांनी मे महिन्यात शुद्धीपत्रक आणले. वास्तविक, हा निधी मागच्या सरकारच्या काळात मंजूर झाला आहे. त्यातील काही कामे झाली. मात्र त्याला मंजुरी मिळायची होती. त्या कामांना खीळ घालून नव्या सरकारच्या काळात वेगळीच कामे या यादीत समाविष्ट करण्यात आलीत. हेही गंभीर आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

प्रसिद्ध मराठी अभिनेता अडकला लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल, पत्नी आहे तरी कोण?

Panchang 25 December 2025: आजच्या दिवशी हळद, बेलफळ चूर्ण किंवा आवळकाठी चूर्ण पाण्यात टाकून स्नान करावे

Kolhapur Election : माजी नगरसेवकांनी शड्डू ठोकल्याने चुरस; मतांची गोळाबेरीज करण्याचे आव्हान, मताधिक्य कोणाला याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT