Dr. kaivalya.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

इवलासा ब्रुनेई देश "कोरोना' विरूद्ध कसा लढतोय? वाचा 

सकाळवृत्तसेवा


सांगली-ब्रुनेई...सिंगापूरपासून तासाच्या हवाई अंतरावरील देश. पाच लाख लोकसंख्येचा, आपल्या गोवा राज्याएवढा. या देशाच्या कोविड विरोधातील लढाईबद्दल सांगत आहेत मूळचे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्‍यातील बालगावचे 
डॉ. कैवल्य वडजे... 

इथे राजेशाही. इथले सुलतानच सर्वेसर्वा. त्यांच्याच आदेशाने त्यांचे मंत्रिमंडळ कारभार पाहते. इथली आरोग्य यंत्रणा पूर्णपणे शासनाची. मात्र इथल्या आरोग्यमंत्र्यापासून सचिवांपर्यंत अधिकारी डॉक्‍टरच. इथल्या सर्वात मोठ्या राजा इस्तेरी पेंगिरान अनकसालेहा हॉस्पिटल (रिपाज) हॉस्पिटलच्या भूलशास्त्र विभाग व अतिदक्षता विभागात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून मी सप्टेंबर 2018 पासून काम करतोय. 
चीनसह आजूबाजूच्या सिंगापूर, मलेशिया, फिलिपाईन्समध्ये कोविडने लोक मृत्युमुखी पडत असतानाही ब्रुनेई मात्र शांत होता. इथल्या शासनाने मात्र वेळीच सर्व पातळ्यांवर तयारी सुरू केली. पहिल्यांदा त्यांनी परदेशात शिक्षणासाठी असलेले विद्यार्थी स्पेशल विमानाने परत आणले. इथले मूळनिवासी विद्यार्थी जगभरात शिकायला असतात. ते येण्याआधीच त्यांच्यासाठी अलगीकरण कक्ष तयार ठेवले होते. क्वारंटाईनची मुदत संपल्यानंतर त्यांन घरी जाऊ दिले. माझ्या हॉस्पिटलपासून सुमारे पन्नास किलोमीटरवर सुमारे 120 बेडचे एक स्वतंत्र हॉस्पिटल 2012 च्या सार्स साथीच बांधले होते. सध्या त्याचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्यात आले आहे. तिथेच आता आणखी दीडशे खाटांचे हॉस्पिटल उभारणीचे काम गतीने सुरू आहे. 


आजघडीला इथे 138 कोविड बाधित होते. त्यातील 136 बरे झाले आहेत. आत्तापर्यंत फक्त एकाचा मृत्यू झाला आहे. ब्रुनेईत पहिला रुग्ण सात मार्चला आढळला. नव्हे तो इथल्या यंत्रणेने शोधून काढला आणि तेव्हापासून सुसज्ज तयारीसह कोविडविरोधातील लढाई सुरू आहे. या देशात सर्व वैद्यकीय स्टाफसाठी अद्ययावत साधनसुविधा आहेत. चीनमध्ये चर्चा सुरू असतानाच इथे वैद्यकीय स्टाफचे प्रशिक्षण सुरू झाले. अद्ययावत पीपीईसह-व्हेंटीलेटर आयात करण्यात आली. या चांगल्या तयारीमुळेच आरोग्य व्यवस्थेतील एकालाही कोविडची अद्याप लागण नाही. सध्याच्या काळात या सर्व स्टाफसाठी शासनाने चांगले वेतनेतर भत्ते जाहीर केले आहेत. डॉक्‍टरांसाठी इथे मिळणारा सन्मान मोठा आहे. आमच्या आयसीयु कक्षाबाहेरील एका खोलीत लोक रुग्ण आणि डॉक्‍टरांसाठी अनेक भेटवस्तू आणून ठेवतात. त्यामागे त्यांची डॉक्‍टरांप्रती कृतज्ञतेचा आणि रुग्णांप्रती कृतज्ञतेचा भाव असतो. लोक शासनाचे आणि डॉक्‍टरांचे आदेश पाळतात. आज संपूर्ण देश लॉकडाऊन असला तरी व्यवहार सुरळीत आहेत. एका शहरातून अन्य शहरात जाता येत नाही. त्यामुळे ब्रुनेईत कम्युनिटी प्रसार रोखण्यात चांगले यश आले आहे. 


भारताच्या प्रचंड लोकसंख्येचा विचार करता सक्षम राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था उभी करण्यास पर्याय नाही. आपल्याकडे सरकार सर्व जबाबदारी खासगी व्यवस्थेकडे ढकलली जातेय. गेल्या पंचवीस वर्षांत भारतातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेकडे शासनाचे मोठे दुर्लक्ष झाले. ही प्राथमिक गरज लक्षात घेता या क्षेत्रात मोठी गुंतवणूक सतत केली पाहिजे. यापुढची आव्हाने लक्षात घेता प्रसंगी खासगी इन्फ्रास्ट्रक्‍चर ताब्यात घेऊन देशातील गरिबातील गरीब माणसाला दर्जेदार आरोग्यसुविधा मिळाल्या पाहिजेत. गावापासून शहरापर्यंत सक्षम आरोग्य सुविधा उभ्या करताना तिथे डॉक्‍टरांना चांगले वेतन-सुविधा देऊन नियुक्ती केली पाहिजे. मी काही वर्षे भारतात प्रॅक्‍टीस केली मात्र तिथल्या खासगी सेवेत मला काम करावे वाटले नाही. चांगल्या डॉक्‍टरना सरकारी सेवेत काम करण्यासाठी चांगले वातावरण नाही. ते तयार करण्याची जबाबदारी शासनाची आहे. सध्याच्या साथीत प्रगत म्हणवणारे युरोपियन देशही अपयशी ठरले आहेत. कोविडने सर्वांनाच उघडे केले आहे. आपण त्यातून शिकून योग्य तो धडा घेतला पाहिजे. युद्ध असो वा नसो सैन्य नेहमीच तयार ठेवतोच. हेच आरोग्य व्यवस्थेला लागू पडते. खर्चाचा विचार न करता प्रत्येकाला चांगले आरोग्य देणारी व्यवस्था उभी करावीच लागेल. आपल्याकडील परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे, मात्र लोकांनी दक्षता घेतली पाहिजे. भारतात विषाणूचा प्रसार गतीने होत नाही असे दिसतेय. मात्र गाफील राहता कामा नये. भविष्यात खूप मोठ्या लढाईसाठी पूर्ण तयारीने उतरावे लागेल हे नक्की. 
-(शब्दांकनः जयसिंग कुंभार) 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT