The administration will decide the rate of essential things 
पश्चिम महाराष्ट्र

इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये कशी घेतात काळजी 

शैलेश पेटकर


सांगली ः मिरज सिव्हिल हॉस्पिटल आणि मिरज औद्योगिक वसाहतीत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाची इमारत सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात रणभूमीची ठिकाणेच झाली आहेत. तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर कडेकोट बंदोबस्ताने वेढला आहे. एरवी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने बहरलेला हा परिसर सध्या मात्र सायरन वाजवत येणाऱ्या रुग्णवाहिका, डॉक्‍टर, नर्स आणि आरोग्य-पोलिस कर्मचाऱ्यांच्या वावरामुळे गंभीर आणि सुन्न अशा वातावरणामुळे वेगळाच भासत आहे. 


आज दुपारी बाराच्या सुमारास आज या परिसरात भेट देण्यासाठी गेल्यानंतर तिथल्या वातावरणातील ती भयकळा पदोपदी जाणवत होती. एखादी रुग्णवाहिका आली की जणू साऱ्यांना धडकी भरते. पाठोपाठ वॉर्डबॉयपासूनची सारी यंत्रणा पुढे सरसावते. आलेली व्यक्ती संशयित म्हणून आणलेली असते. ती रुग्ण नसते. मात्र त्याला हाताळताना रुग्ण म्हणूनच सर्वोतोपरी दक्षता घ्यावी लागते. तिथं आल्याने त्या सुदृढ व्यक्तीच्या चेहऱ्यावरही तो ताण सतत जाणवत असतो. 
मिरज सिव्हिलचा संपूर्ण परिसर जिल्ह्याचे कोविड उपचाराचे मध्यवर्ती हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आले आहे. महिन्यापूर्वी जिल्ह्यातील इस्लामपूरमधील एकाच कुटुुंबातील 26 जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जिल्ह्याची यंत्रणा सजग झाली. मिरज सिव्हिलमधून बरे होणारे रुग्ण पुढे निगराणीखाली ठेवण्यासाठी म्हणून तंत्रनिकेतन महाविद्यालयात हलवले जातात.

निगेटीव्ह चाचण्या प्राप्त झालेल्या रुग्णांना हलवतानाच रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांनाही सध्या इथे आणले जातेय. इथे येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझेशन कक्षातूनच जावे लागते. या परिसरात वावरण्यासही बंदी आहे. येणाऱ्या प्रत्येकाला घ्यावयाची काळजीबद्दल कटाक्षाने सांगितले जाते. क्वारंटाइन कक्षातील प्रत्येकाची दर दोन तासांनंतर वैद्यकीय तपासणी होते.

कारण कोरोनाचा अहवाल एकदा निगेटिव्ह आल्यानंतरही पुन्हा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे येणारा प्रत्येक रुग्ण चोवीस तास देखरेखीतच असतो. त्यांच्यासाठी सकस आणि पूर्ण दक्षता घेतलेल्या अन्नाची पाकिटे तसेच शुद्ध पाण्याची जय्यत तयारी आहे. रुमच्या बाहेरच ही व्यवस्था केलेली असते. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने तातडीने ठेकेदार नेमून यंत्रणा सज्ज ठेवली आहे. 

या परिसरात ड्युटीवर असणाऱ्या डॉक्‍टर, नर्स, कर्मचारी, पोलिसांसाठी मास्क, सॅनिटाझर अशा सर्व सुविधा जय्यत ठेवल्या आहेत. त्याबरोबरच हा संपूर्ण परिसर दर दोन तासांतून निर्जंतुकीकरण केला जातो. क्वारंटाइन कक्षात फक्त डॉक्‍टरांनाच परवानगी असून त्यांना "पीपीई' कीट देण्यात आली आहेत. 


इथे काम करणारे एक कर्मचारी सतत तणावाखाली दिसतात. घरच्यांना इथे ड्युटी असल्याचे माहीत आहे. ते सतत काळजीत असतात मात्र ड्युटी फर्स्ट हेच ब्रीद या कर्मचाऱ्यांच्या बोलण्यातून जाणवते. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT