How To View A Solar Eclipse Safely : 
पश्चिम महाराष्ट्र

सूर्यग्रहण पाहताना काेणती काळजी घ्यावी ..?

सकाळ वृत्तसेवा

सांगली : येत्या २६ डिसेंबरला कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची पर्वणी आहे. समाजातील प्रचलित समजुती बाजूला ठेवून प्रत्येकाने हा आनंद लुटावा. मात्र त्याआधी थोडी काळजी घ्या. दक्षता घ्या. केवळ डोळ्यांनी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू नका. सूर्य प्रकाशातील अतिनील किरणांनी डोळ्यांतील कॉर्निया या नाजूक पटलास इजा होऊन दृष्टिदोष निर्माण होऊ शकतो.

सोलार फिल्टर्स उपलब्ध नसल्यास आरशाच्या साहाय्याने घरातील भिंतीवर सूर्याचे प्रतिबिंब घेऊन त्यामधे ग्रहण पाहावे.
ग्रहणांबद्दल समाजात अजूनही पारंपरिक समजुती आढळतात. आता त्या गैर आणि कालबाह्य ठरल्या आहेत. खगोल विज्ञानात त्यांना कसलाही आधार नाही. त्यामुळे, डोळ्यांची योग्य ती काळजी घेऊन सूर्य ग्रहण पाहिल्यास त्यापासून कोणासही कधीही, कसलाही अपाय होत नाही.

गरोदर स्त्रियांना  वाटणारी भीती अनाठायी
गरोदर स्त्रियांना ग्रहण काळात वाटणारी भीती अनाठायी आहे. वास्तविक ग्रहण पाळण्याच्या अट्टाहासामुळे शारीरिक हालचाल, अन्न-पाणी ग्रहण, मल-मूत्र विसर्जन आदी गोष्टींना मज्जाव करणे हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. अज्ञानापोटी, भीतीपोटी ग्रहण पाळल्यामुळे अनेकदा गरोदर स्त्रियांना नाहक प्राण गमवावे लागले असल्याची उदाहरणे दर वेळी पाहायला मिळतात.ग्रहण पाळले नाही तर गर्भात विकृती निर्माण होतात असाही एक गैरसमज प्रचलित आहे. गर्भाच्या अशा विकृतींमागील कारणे वेगळी असतात.

अज्ञान दूर ठेवून आनंद घेणे गरजेचे

मातेने सेवन केलेली प्रतिजैविके Antibiotics, विविध औषधे, आणि गुणसूत्रांतील बिघाडांमुळे गर्भात विकृती संभवते. ग्रहणांमुळे नाही.ग्रहण हा प्रकाश व सावली मधील लपंडावाचा खेळ आहे. ग्रहण काळात ‘सूर्य-चंद्रा सोबत नाश्‍ता’ करूयात, असे पुण्यातील ‘नव निर्मिती’ या विज्ञान प्रसाराचं काम करणाऱ्या संस्थेने आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील हौशी खगोल निरीक्षकांनी व निसर्ग प्रेमिंनी असे ग्रहण काळातील नाश्‍त्याचे प्रयोग यापूर्वी अनेकदा केलेले आहेत.

शंकर शेलार, खगोल अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात सहा संचालकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT