How will Ganeshotsav be held in August? 
पश्चिम महाराष्ट्र

ऑगस्टमध्ये गणेशोत्सव कसा होईल? कुणाला लागलीय चिंता....

सकाळवृत्तसेवा

कामेरी (जि. सांगली) ः कोरोना संकटामुळे ऑगस्टमध्ये होणारा गणेशोत्सव होईल का? याची चिंत्ता मूर्तीकारांना लागली आहे. हा उत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणात साजरा केला नाही, तर मोठ्या मूर्तींचे करायचे काय ? याच बरोबर येणाऱ्या आर्थिक संकटाला कसे सामोरे जायचे हा प्रश्न मूर्तिकारांसमोर आहे. 

वाळवा तालुक्‍यातील कामेरी, इस्लामपूर, साखराळे आदि परिसरात मूर्तिकारांची संख्या मोठी आहे. दसऱ्यानंतरच मूर्ती बनवण्याचा प्रारंभ या व्यावसायिकांनी सुरू केला आहे. मूर्ती बनवण्यासाठी वर्षभर मेहनत घेतात. काही मूर्तिकारांकडे कामगार आहेत. त्यांचा पगार त्यांना रोजच्या रोज दिला जातो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवल्या आहेत. त्यावरही पुढच्या वर्षीपासून बंदी येणार आहे. त्यामुळे यावर्षी फक्त या मूर्तीकारांना मूर्ती बनवण्याबाबत दिलासा मिळाला. 

मूर्तीकारांना या मूर्ती बनवण्यासाठी उधारीवर प्लास्टर ऑफ पॅरिस, रंगरंगोटी, ब्रश आदी साहित्याची मोठी खरेदीही केली आहे. तीन ते दहा फुटांपर्यंतच्या मूर्तीही बनवल्या आहेत. घरगुती लहान गणपती बनवायला हाती घेतलेत. उधारीवर आणलेला मालाची बीले उत्सवात झालेल्या विक्रीतून भागविली जातात. मागील हंगामात पुराचे सावट उत्सव काळातच आले. 

यंदा उत्सवापूर्वी कोरोनाचे संकट आले. हा प्रादुर्भाव संपेल का ? येणाऱ्या गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता येईल का ? मोठ्या मूर्तींचे काय करायचे ? त्याची धास्ती आत्तापासून या मूर्तीकारांना लागली आहे. काही मोठी सार्वजनिक गणेश मंडळे चार महिने अगोदरच ऍडव्हान्स रक्कम देत होते. आता तर अवघड परिस्थिती झाली आहे. 

कारागिरांवर मोठे आर्थिक संकट

वर्षभर गणेशमूर्ती बनवण्याचे काम करतो. यंदा "कोरोना'चे सावट असल्याने उत्सव मोठा साजरा होतोय की नाही ? याची भीती आहे. कारागिरांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने मदतीचा हातभर लावावा.

- अजय क्षीरसागर, मूर्तीकार. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘मतचोरी’चा बॉम्ब फोडणाऱ्या काँग्रेसचीच चूक? राहुल गांधींनी आरोप केलेल्या क्षेत्रात उमेदवाराची डबल एंट्री! कोणावर विश्वास ठेवायचा?

Pune Parking Scam : महापालिका वाहनतळांवर पाचपट वसुली; मोटारींना ७० रुपये, तर दुचाकींना ३० रुपये प्रतितास आकारणी

Viral Video : ताशी १८० किमी वेगाने धावली वंदे भारत ट्रेन, इंजिनमध्ये ठेवलेल्या ग्लासातून एक थेंबही पाणी सांडले नाही, पाहा व्हिडिओ

Leopard Viral Video : गाईला बघून घाबरला बिबट्या, सीसीटीव्ही फुटेज पाहून म्हणाल; कोल्हापुरी नाद खुळा...

Latest Marathi Live Update News: कोरेगाव पार्क अपघाताच्या पाठोपाठ पुण्यात आणखी एक भीषण अपघात

SCROLL FOR NEXT