However, demand for chicken increased and poultry business flourished again 
पश्चिम महाराष्ट्र

अंंडी, चिकनला मागणी वाढली, पोल्ट्री व्यवसाय पुन्हा तेजीत 

पोपट पाटील

इस्लामपूर : कोरोना काळात समाज माध्यमात चुकीचा संदेशाने पोल्ट्रीला घरघर लागली. कोरोनाविरुध्द लढाईत पोषक आहार म्हणून अंडी, चिकनला मागणी वाढल्याने व्यवसायाला पुन्हा उभारी मिळत आहे. 

समाज माध्यमावर पोल्ट्रीतील पक्षाच्या शरीरांतून विषाणूंचा प्रसार होतो अशी खोटी माहिती पसरल्याने व्यावसायांत समस्या निर्माण झाल्या. खोट्या माहितीचा एवढा मोठा प्रसार झाला, की नागरिकांनी चिकन, अंडी खाणे पूर्ण बंद केले. पक्षी, अंड्यांची विक्री थांबली. पोल्ट्री मालक गावोगावी फिरून 100 रुपयाला 5 पक्षी असे विक्री करू लागले. हजारो पोल्ट्री व्यावसायिक देशोधडीला लागले. चिकन, मटण विक्रेते व्यावसायिकांवर कुऱ्हाड कोसळली. 

कोंबडी पिले निर्मिती केंद्र बंद झाली. काही ठिकाणी एक दिवसाची पिले, मोठे पक्षी सुद्धा खड्डे काढून गाडण्यात आले. त्यामुळे संकट गंभीर झाले होते. आता पुन्हा कोरोना रुग्णांसाठी अंड्यांच्या माध्यामातून जीवनसत्वांचा पुरवठा होतो. अशा माहिती तज्ञांकडू प्रसारीत झाल्याने अंड्यांना मागणी वाढली आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी अंड्यांतून प्रथिने मिळतात. ती गरज चिकनमार्फत पुरवली जाते. त्यामुळे चिकनलाही मागणी वाढली. चिकनचा दर 180 रुपये किलो, तर अंडी चार रुपयावरून साडेपाच रुपये झाली आहेत. 

मार्च-एप्रिल या दोन महिन्यात विक्रीस आलेला पक्षी कोरोनामुळे फुकट वाटले. पाच महिन्यात तीन लाखांचे नुकसान झाले. आता पुन्हा मागणी वाढली आहे. चांगला प्रतिसाद आहे. पुन्हा चांगले दिवस येतील अशी अपेक्षा आहे. 
- अनिल माने, पोल्ट्री व्यावसायिक, पेठ

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT