पश्चिम महाराष्ट्र

अंजनगाव खेलोबातून लाखो रुपयांची डिझेल चोरी

अक्षय गुंड

उपळाई बुद्रुक (सोलापूर) : माढा-सोलापूर रस्त्यावर अंजनगाव खेलोबा येथील विश्वनाथ पेट्रोलियम पंपावरून 2 लाख 27 हजार 200 रूपये किंमतीचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघा अज्ञातांविरोधात माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजनगाव खेलोबा येथे शितल सुरवसे यांचा हिंदुस्थान कंपनीचा विश्वनाथ पेट्रोलियम नावाने पेट्रोलपंप असून पती रवि मगन सुरवसे हे पेट्रोलपंपाचे कामकाज पाहतात. सदर पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून संतोष उत्तम कोरके (रा. अंजनगाव खे) व पेट्रोल, डिझेल सोडण्याकरीता श्रीमंत व्हनमाने (रा.कुंभेज) असीम उस्मान तांबोळी, पंडित दिंगबर देवकते, अक्षय गायकवाड चैतन्य गोरे  (रा.अंजनगाव खे) हे काम करतात. गुरूवारी सायंकाळी रवि सुरवसे हे रात्री दहा वाजता पंपावरून पैशांचा हिशेब घेऊन घरी आले.

शुक्रवारी सकाळी पेट्रोलपंपावरून नोझेलमधून डिझेल येत नसल्याचे कळले. डिझेलच्या टाकीत डिप टाकून माप बघितले असता, 2 लाख 27 हजार 200 रूपये किंमतीचे २९४५ लिटर डिझेल चोरीला गेल्याचे समजले. त्यानंतर याबाबतची खात्री पटल्याने पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम कल्पना देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता अज्ञात दोघांनी पाईपाच्या सहाय्याने डिझेल काढून घेऊन जात असल्याचे दिसले. याबाबतची फिर्याद शितल रवि सुरवसे यांनी माढा पोलिस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पोलिस नाईक विशाल पोरे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT