पश्चिम महाराष्ट्र

Lockdown : निर्यातक्षम द्राक्षे बागांमध्ये पडून; शेतकऱ्यांपुढे अर्थिक संकट

अंकुश चव्हाण

कलेढोण (जि. सातारा) : कोरोनामुळे खटावच्या पूर्व भागातील कलेढोण, विखळे, पाचवड, मुळीकवाडी भागातील सुमारे 25 टक्के द्राक्षबागांतील निर्यातक्षम द्राक्षे पडून आहेत. संचारबंदीमुळे बागेतील माल तोडण्यासाठी मजुरांची कमतरता, कोल्डस्टोरेजला लागलेल्या टाळ्यांमुळे या निर्यातक्षम द्राक्षांची स्थानिक बाजारपेठेत कमी किमतीने विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. तर द्राक्ष लगडलेल्या स्थितीत अनेक द्राक्षबागा उभ्या आहेत. 

खटाव तालुक्‍यातील पूर्व भागातील कलेढोण, विखळे, पाचवड, मुळीकवाडी, गारळेवाडी, तरसवाडी, गारुडीत द्राक्षांचे आगार आहे. परिसरात सुमारे 700 एकर क्षेत्रांवर द्राक्ष बागायती पीक घेतले जाते. यावर्षी जास्तीच्या पावसामुळे बागांतील घड जिरणे, घडकुजीमुळे द्राक्षांचे उत्पादन घटले आहे. तर ढगाळ वातावरणात बागांवर मारल्या जाणाऱ्या औषधांमुळे उत्पादन खर्च वाढला आहे. निर्यातक्षम द्राक्षांना परदेशात सुमारे 80 ते 95 रुपयांपर्यंतचा भाव मिळतो. मात्र, सध्या सुरू असलेल्या "लॉकडाऊन'मुळे बागांतील माल तोडण्यासाठी मजूर मिळेनात, एकर-दोन एकरांतील माल तोडण्यासाठी हवा तसा कामगारवर्ग भेटत नसल्याने द्राक्षबागा "जैसे थे' अवस्थेत उभ्या आहेत.

त्यातच स्थानिक व्यापाऱ्यांकडून कॅरेट दोन कॅरेटभर एवढाच माल उचलला जातो. बाकीच्या मालाचे करायचे काय ? हा शेतकऱ्यांपुढे प्रश्‍न उभा आहे. तर परराज्यातील व्यापाऱ्यांकडून कमी दराने द्राक्षांची मागणी केली जात आहे. मागणी करूनही वाहतुकीसाठी लागणारे विविध परवाने घेताना नाकीनऊ येत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्यावर मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. 

भय इथले संपत नाही; कऱ्हाडकरांना हवी सुरक्षिततेची हमी

यंदा निर्यातक्षम द्राक्ष घेण्यासाठी जादा खर्च आला आहे. त्यातूनही द्राक्षबागा निर्यातीसाठी तयार केल्या. मात्र, कोरोनामुळे झालेल्या निर्यातबंदीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. 
सयाजी पाटील, शेतकरी, कलेढोण 

व्हिडिओ कॉलींगद्वारे आईचे अंत्यदर्शन

सातारा शहर भाजपतर्फे गरजूंना मोदी किटचे वाटप 

सातारा : भारतीय जनता पक्षाच्या सातारा शहर शाखेतर्फे बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील महामार्गाच्या पुलाखाली राहात असलेल्या राजस्थानी कलाकारांच्या वस्तीत 70 जणांना तसेच आकाशवाणी झोपडपट्टीतील 47 आणि जरंडेश्वर नाका येथे असलेल्या उत्तर प्रदेशच्या चार व कर्नाटकमधील एका कुटुंबास मोदी किटचे वाटप करण्यात आले.
 
भाजपचे शहराध्यक्ष व नगरसेवक विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. या वेळी सरचिटणीस प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, विठ्ठल बलशेटवार, माजी नगरसेवक किशोर गोडबोले, माजी नगरसेवक ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, शैलेंद्र कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष विक्रम बोराटे, किशोर गालफाडे, भटक्‍या विमुक्त आघाडीचे अध्यक्ष बजरंग चव्हाण, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील 500 कुटुंबाना मोदी किट (तांदूळ, साखर, गहू, चहा, तेल, चटणी, हळद, मीठ, साबण आदी) पोचविण्याचा भाजपचा मानस असून, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन श्री. गोसावी यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT