hundekari team win 
पश्चिम महाराष्ट्र

videoहुंडेकरी' व औरंगाबादचा साई क्रिकेट संघ अजिंक्‍य 

सकाळ वृत्तसेवा

नगर : अहमदनगर जिल्ह्यातील क्रिकेटला कॉम्प्टन कंपनीने उभारी दिली. गेल्या 30 वर्षांपासून ते स्पर्धा भरवित आहेत. कै. बाळासाहेब पवार यांचा ही स्पर्धा सुरू करण्यात मोठा वाटा होता. त्यांच्या स्मृतिनिमित्त आंजनेय प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत आहे. या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील तसेच राज्यातील क्रिकेटपटूंना एक प्रकारे व्यासपीठ मिळत आहे. आर्थिक संकट असतानाही हा उपक्रम त्यांच्याकडून राबविला जात आहे.

दिग्गजांच्या हस्ते पारितोषिक वितरण 
आंजनेय प्रतिष्ठानातर्फे आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 16 वर्षांखालील गटात येथील हुंडेकरी क्रिकेट ऍकॅडमीने, तर 19 वर्षांखालील गटात औरंगाबादच्या साई क्रिकेट ऍकॅडमी संघाने अजिंक्‍यपद मिळविले. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, "सकाळ'चे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. 

दिग्गजांची उपस्थिती 
राज्य आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष डॉ. पोपटराव पवार, सीजी कंपनीचे अधिकारी अविनाश पाटील, अजय पांढरीपांडे, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव माणिक विधाते, गणेश गोंडाळ, नगरसेवक संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, पत्रकार महेंद्र कुलकर्णी, सुमतिलाल कोठारी, परवेज सय्यद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कपील पवार यांनी केले. ज्योत्स्ना पवार यांनी आभार मानले. स्पर्धेचे धावलेखक म्हणून अजय कविटकर, तर पंच म्हणून प्रेम कांबळे, विशाल कांबळे यांनी काम पाहिले. 

यांनी मारले मैदान 
निकाल असा : 16 वर्षांखालील गट ः विजेता- हुंडेकरी क्रिकेट ऍकॅडमी, उपविजेता- समर्थ क्रिकेट ऍकॅडमी, उत्कृष्ट गोलंदाज- संकल्प कांबळे (साईदीप हीरोज), मालिकेचा मानकरी- अश्‍कान काझी (हुंडेकरी क्रिकेट ऍकॅडमी), उत्कृष्ट फलंदाज- लहू डांगे (साई क्रिकेट ऍकॅडमी, श्रीगोंदे) 


19 वर्षांखालील गट ः विजेता- साई क्रिकेट ऍकॅडमी, औरंगाबाद, उपविजेता- साईदीप हिरोज, उत्कृष्ट फलंदाज- अखिलेश गवळे (साईदीप हीरोज), मालिकेचा मानकरी- रिषी राऊत (साई क्रिकेट ऍकॅडमी, औरंगाबाद), उत्कृष्ट गोलंदाज- सार्थक वाकळे (साई क्रिकेट ऍकॅडमी, श्रीगोंदे). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT