Almatti Dam esakal
पश्चिम महाराष्ट्र

Almatti Dam : कोल्हापूर, सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीत 100 TMC पाणी, महाराष्ट्रातील पावसामुळे आवक वाढली

कर्नाटकचे अधिकारी महाराष्ट्रातील कोयना धरणावर नियुक्त केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बुधवारी आलमट्टीत ९९.३१७ टीएमसी पाणीसाठा झाला. १२३ टीएमसी क्षमता असलेले आलमट्टी धरण पाऊस नसतानाही गेल्या काही वर्षांपासून लवकर भरत आहे.

चिक्कोडी : आलमट्टी जलाशयात (Almatti Dam) एक जुलै रोजी केवळ ३७ टीएमसी पाणी जमा झाले होते. तर बुधवारी (ता. १७) तब्बल ९९.३१७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जलाशय ८०.६९ टक्के भरले आहे. म्हणजेच केवळ १६ दिवसांत जलाशयात ६२ टीएमसी पाणी साठा झाला आहे. महाराष्ट्रातील पावसामुळे (Maharashtra Rain) आलमट्टीत पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी ९२ हजार क्युसेक इतकी आवक होती, तर ६० हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी भागातील नद्यांतील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे.

आलमट्टीच्या १४ दरवाजांतून वीजनिर्मितीसाठी ३५ हजार क्युसेक आणि विसर्ग म्हणून २५ हजार क्युसेक असे एकूण ६० हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. महाराष्ट्रात उगम पावलेल्या नद्यांतून वाहून येणारे पाणी चिक्कोडी भागातील विविध नद्यांतून कृष्णा नदीत मिसळून थेट आलमट्टी जलाशयात जात आहे. त्यामुळे या धरणाच्या बॅक वॉटरचा तडाखा बसत आहे.

गेल्या काही वर्षांपासून पूरस्थिती हाताळण्यासाठी महाराष्ट्रातील अधिकारी कर्नाटकच्या आलमट्टी धरणातील आवक आणि विसर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी नियुक्त केले आहेत. तर, कर्नाटकचे अधिकारी महाराष्ट्रातील कोयना धरणावर नियुक्त केले आहेत. त्यामुळे नियोजनाचा परिणाम म्हणून अधिक पाऊस होऊनही पुराचा फटका बसलेला नाही.

यंदा जूनमध्ये पावसाने चांगली साथ दिलेली नाही. काहीसा पाऊस झाला असला तरी जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागात पावसाची प्रतीक्षा आहे. महाराष्ट्रातील धरणांतून पाणी सोडल्यास व पाऊसही संततधार राहिल्यास आणि आलमट्टीतून विसर्ग नसल्यास नद्यांना पाणी वाढून पूरस्थिती निर्माण होत होती. यंदा पाऊस कमी असल्याने व महाराष्ट्रातील धरणांत पाणीच नसल्याने विसर्गाचा प्रश्नच आलेला नाही. त्यातच काही दिवस जोरदार पाऊस झाल्याने वाहून येणारे पाणी थेट आलमट्टीला मिळत आहे. परिणामी केवळ पंधरा दिवसांत आलमट्टी धरण शंभर टीएमसीपर्यंत भरण्याकडे आले आहे.

बुधवारी आलमट्टीत ९९.३१७ टीएमसी पाणीसाठा झाला. १२३ टीएमसी क्षमता असलेले आलमट्टी धरण पाऊस नसतानाही गेल्या काही वर्षांपासून लवकर भरत आहे. त्यामुळे नंतर पाऊस वाढल्यावर जादा विसर्ग करावा लागला आहे. त्यातूनच गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये काही वेळेला दोन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग करावा लागला होता. तो आतापर्यंतचा सर्वाधिक विसर्ग ठरला आहे. आलमट्टीच्या बॅक वॉटरचा फटका चिक्कोडी विभाग आणि महाराष्ट्राला बसत असल्याचाही आरोप आहे. या धरण क्षेत्रात पाऊस नसतानाही त्या भागाला पाणी मिळत आहे.

चार वर्षांतील १७ जुलैची पाणीपातळी (टीएमसीमध्ये)

धरण क्षमता २०२१ २०२२ २०२३ २०२४

  • आलमट्टी १२३ -- ८५.२० ५३.२५ ९९.३१७

  • कोयना १०५.२५ ४७.२१ ५७.८६ ३७.४२ ४३.०९

  • राधानगरी ८.३६ ३.७१ ६.१६ ५.६१ ४.७९

  • काळम्मावाडी २५.४ १०.८३ १५.९९ ७.६३ ११.२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT