पश्चिम महाराष्ट्र

वाद पेटला... प्रणिती शिंदेंना मंत्रीपद न दिल्यास पुतळे जाळणार

सकाळ वृत्तसेवा


सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांचा मंत्रीमंडळात समावेश न केल्यास नेत्यांचे पुतळे जाळण्यात येतील, असा इशारा आज गुरुवारी येथे झालेल्या ठिय्या आंदोलनाप्रसंगी देण्यात आला. 

एक दिवशीय धरणे आंदोलन
आज सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस भवन समोर युवक काँग्रेसच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन झाले. राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला सदर मंत्रिमंडळात राज्यातील अनेक नवोदित आमदारांना संधी देण्यात आली. मात्र तीन-तीन वेळा मातब्बरांचा पराभव करून विजयी झालेल्या तसेच सोलापूर जिल्ह्यातील एकमेव काँग्रेसचे आमदार असताना आमदार प्रणिती यांना डावलण्यात आले. सोलापूरने यापूर्वी केवळ राज्याचेच नव्हे तर, देशाचे नेतृत्व केलेला जिल्हा आहे. कॅंाग्रेसच्या कालावधीत मंजूर झालेली अनेक कामे मागच्या सरकारने जाणीवपूर्वक बंद पाडले. या योजना मार्गी लागण्यासाठी प्रणिती यांची मंत्रीपदी नियुक्ती आवश्यक आहे, असे मत यावेळी मांडण्यात आले. 

 आंदोलनात यांनी घेतला सहभाग 
जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, युवक कॅंाग्रेसचे अध्यक्ष बाबा करगुळे, नगरसेविका वैष्णवी करगुळे, फिरदोस पटेल, माजी महापौर आरिफ शेख, जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, योगेश मार्गम, उत्तर अध्यक्ष विवेक कन्ना, सैफन शेख, ओमकार गायकवाड, गणेश साळुंखे, यल्लप्पा तुपदोळकर, युवक अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल अध्यक्ष भिमाशंकर टेकाळे, प्रवक्ते हाजीमलंग नदाफ, सुलेमान तांबोळी, आरिफ पठाण, जेम्स जंगम, वाहिद बिजापुरे, सिद्राम अट्टेलूर, शोकत पठाण, राजासाब शेख, प्रवीण जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष पंडित सातपुते, जुगलकिशोर तिवाडी, राहुल वर्धा, संतोष अट्टेलुर, एजाज बागवान, विवेक इंगळे, प्रकाश आसादे, बबलू बागवान, मीनाक्षी बंकांपुरे, सुरेखा घाडगे, गोविंद कांबळे, अमोल भोसले, विश्वनाथ दुर्लेकर, मुल्ला सर, सुशिलकुमार म्हेत्रे, संजय गायकवाड, श्याम केंगार, शेळके, सिद्धांत रंगापुरे, अभिषेक गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

चला पाहूया... (VIDEO)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: दमदार सुरुवातीनंतर बेंगळुरूने झटपट गमावल्या चार विकेट्स

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT