If you want to go to Mumbai, give four times more the amount 
पश्चिम महाराष्ट्र

मुंबईला जायचं, तर चारपट रक्कम मोजा

सकाळवृत्तसेवा

झरे (जि. सांगली) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने मुंबईला उपजीविकेसाठी गेलेले अनेक नागरिक गावाकडे परतले. पण, गावी बसून तरी उपजीविका कशी भागवायची, या विचारात अनेकजण असतानाच कंपनीकडून प्रत्येकाला कामावर हजर राहण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यामुळे त्यांची परत मुंबईला जाण्यासाठी धडपड सुरू झाली आहे... मात्र त्यासाठी त्यांना चारपट रक्‍कम मोजावी लागते आहे. 

पूर्वीपासून खासगी आराम बस मुंबईवरून प्रवासी आणणे व मुंबईला सोडणे अशी दैनंदिन सेवा करत असतात. एका मार्गावरती आठ ते दहा बसेस धावताना दिसत होत्या. परंतु लॉकडाउनमुळे त्यांची चाके जाग्यावर थांबली होती.

मात्र नोटिसा मिळाल्याने आता मुंबईकरांची परत जाऊन कामावर हजर राहण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे आराम बसेसची चाके पुन्हा फिरू लागली आहेत. एका सीटवर एकच पॅसेंजर घेऊन या गाड्या मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यासाठी प्रवाशांना चारपट भाडे आकारले जात आहे.

पूर्वी मुंबईला जाण्यासाठी किंवा गावाकडे येण्यासाठी 500 रुपये शुल्क आकारले जात होता. ते आता 2000 रुपये घेतले जात आहेत. यामुळे मुंबईला जाणारे प्रवासी अडचणीत आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT