pulse
pulse 
पश्चिम महाराष्ट्र

तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचा गलथान कारभार

हुकूम मुलाणी

मंगळवेढा : तालुक्यातील निंबोणी येथील स्वस्त धान्य दुकानदारांकडून कार्डधारकांना माल दिला जात नसल्याची तक्रार 23 फेब्रुवारीला करूनही या तक्रारीची दखल न घेतल्याने वंचित कार्डधारकांचा जमाव मालासाठी दुकानासमोर गोळा झाल्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी भेट देऊन उपलब्ध मालाचा पंचनामा करण्यात आला.पण तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचा गलथान कारभार समोर आला.

याबाबत माहिती अशी की, तालुक्याच्या दक्षिण भागातील निंबोणी गावातील बहुतांश कार्डधारक परगावी असल्याने याचा गैरफायदा घेत तक्रार यावेळी ग्रामस्थांनी केली. शासनाने कार्डधारकांनी व युनिट संख्या आधार लिंक करूनही ऐन दुष्काळात कार्डधारकांचा धान्यापासून वंचित उपासमार सहन करावी लागत आहे. मालासाठी उडवाउडवीची उत्तरे दिली जात तक्रार 23 फेब्रुवारीला करण्यात आली. परंतु, पुरवठा विभागाने याकडे गांभीर्याने न पाहता सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्यामुळे केल्यामुळे रास्त भाव दुकानदार गैरप्रकार करण्यास अधिक संधी मिळत गेली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. 30) सकाळी दुकानासमोर कार्डधारकाचा जमाव जमा झाला आणि दूरध्वनीवरून कल्पना दिली. यावेळी पुरवठा निरीक्षक व गावकामगार तलाठी यांनी घटनास्थळी हजर झाले.

ग्रामस्थांनी त्यांच्याकडे रास्त भाव दुकानदार कडून दरमहा नियमित धान्य वाटप केले जात नाही, ई- पाॅज मशीनवर अंगठा घेऊनही धान्य दिले जात नाही, कार्डधारकांना अरेरावीची भाषा वापरली जाते,पाचशे मशीन वरून निघणारी पावती लाभार्थ्यांना दिली जात नाही,पात्र अन्नपूर्णा, अंतोदय ,अन्नसुरक्षा ,प्राधान्य या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत, कार्डधारकांना दिल्या जाणाऱ्या धान्याची जादा दराने आकारला जात आहे, चालू महिन्यातील धान्य हे स्वतः न करता शेजारच्या गावातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून केली जात आहे शिवाय ग्राम दक्षता समिती स्थापन केली असल्याच्या तक्रारी नोंदवल्या.दरम्यान  पुरवठा निरीक्षक गाव कामगार तलाठी यांनी ग्रामस्थांसमोर पंचनामा केला असता त्यात 3.5 पोती तांदूळ, 3.25 पोती चना दाळ ,4.8 पोती तुर दाळ, 3.8 पोती उडीद दाळ इतका माल आढळून आला यामध्ये  50 कार्डधारकांना पात्र कार्डधारकांना माल दिला नसल्याचे आढळून आले. तर 100 पेक्षा अधिक कार्डधारक स्वस्त धान्यापासून वंचित राहिले. तक्रार करूनही तब्बल दोन महिने विलंब करणाऱ्या पुरवठा खात्यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार याकडे मात्र ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT