Illegal passenger traffic continues 
पश्चिम महाराष्ट्र

गाववाल्यांना टेन्शन.. प्रशासनाच्या नजरा चुकवून येणाऱ्यांचे, २०० किमीसाठी मोजतात चार हजार

सकाळ वृत्तसेवा

नगर ः नोकरीनिमित्त जिल्ह्याबाहेर गेलेले अनेक जण कोरोनाच्या भीतीने गावांमध्ये दाखल झाले असले, तरी अजूनही काही जण शहरांमध्ये अडकलेले आहेत. ही मंडळी प्रशासनाच्या नजरा चुकवत गावांकडे काही जण येत आहेत, ही बाब चिंतेची असतानाही त्याचे गांभीर्य कोणीच मनावर घेत नाही, हे विशेष.

वॉर्डबॉय आला केईएममधून पळून

मुंबईतील एका रूग्णालयातील डॉक्टर, नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. त्या रूग्णालयातच अकोला तालुक्यातील एक वॉर्डबॉय काम करीत होता. परंतु आपले वरिष्ठ कोरोनाची लागण झाल्याने उपचार घेत आहेत. कदाचित आपल्यालाही कोरोना होईल या भितीने त्याने घर गाठलं. यायला काहीच साधन नव्हतं म्हणून तो पायी चालत आला. अकोले आणि मुंबईच्या मध्ये डोंगर आहे. त्या डोंगराच्या कडेकडेने तो चालत गावी आला. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने त्याला जिल्हा प्रशसानाने गावातून उपचारासाठी ताब्यात घेतले  आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक जण नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण आदी ठिकाणी गेलेले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाउन करण्यात आले आहे. यामुळे सर्वच उद्योग- व्यवसाय बंद पडलेले असल्यामुळे आता शहरात राहून करायचे काय, असा विचार करून अनेकांनी गावचा रस्ता धरत गाव गाठले आहे. मात्र, ही स्थिती लवकर सुरळीत होईल, अशी आशा बाळगणाऱ्यांची निराशा झाल्याने, त्यांनीही आता गावचा रस्ता धरला आहे.

चोरटी प्रवासी वाहतूक

यातील काहींनी पायी मजल- दरमजल करीत गावाकडे येत आहेत. अशा व्यक्ती दिवसा प्रशासनाच्या नजरेत आल्यानंतर त्यांना अटकाव केला जात आहे. मात्र, काही जण रात्रीचा प्रवास करून आडवाटेने गावांमध्ये दाखल होत आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण आदी भागांतून काहींना नगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले या भागात आणून सोडण्यासाठी चारचाकी वाहनधारक प्रतिव्यक्ती तीन ते चार हजार रुपये आकारत आहेत. या बाहेरून येणाऱ्यांमुळेच आता नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

Pune Municipal Election : ''माघार घेतली म्हणून मंत्री निवडून आला, शब्द देऊन फडणवीसांनी दगा दिला''; भाजप कार्यकर्ता आता अजितदादांच्या पक्षाकडून लढणार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह; कुत्र्यांनी कुरतडून चेहरा केला विद्रूप, हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ असं काय घडलं?

BJP AB Form Controversy: नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म पळवले, गाडीत दोन आमदार अन् जिल्हाध्यक्ष... कार्यकर्त्यांकडून गाडीचा पाठलाग, Video पाहा...

SCROLL FOR NEXT