Almatti Dam Karnataka Government esakal
पश्चिम महाराष्ट्र

Almatti Dam : महाराष्ट्राचा विरोध असतानाही 'आलमट्टी'ची उंची वाढवण्याच्या हालचाली; जल अभ्यासक पुरंदरेंनी मांडलं रोखठोक मत

आलमट्टी प्रकरण पुन्हा पाणी तंटा लवादापुढे मांडणे पुरेसे नाही.

सकाळ डिजिटल टीम

आलमट्टीच्या (Almatti Dam) उंची वाढवण्याबाबतची हालचाल पुन्हा सुरू झाली आहे.

कोल्हापूर : आलमट्टीच्या (Almatti Dam) उंची वाढवण्याबाबतची हालचाल पुन्हा सुरू झाली आहे. याबाबत तत्काळ केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा आवश्यक आहे. त्यासाठी राज्य शासनाने ठोस भूमिका घेऊन धोरण ठरवायला हवे, असे स्पष्ट मत जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे (Water Researcher Pradeep Purandare) यांनी व्यक्त केले.

संपूर्ण कृष्णा नदी खोऱ्यातील सर्व सदस्य-राज्यांचा समावेश असलेली कृष्णा नदी (Krishna River) खोरे संघटना स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. तसा अधिकृत प्रस्ताव केंद्र शासनाकडे विनाविलंब सादर करावा. पाणी वाटप तसेच एकात्मिक जलाशय प्रचलनासाठी नजीकच्या भविष्यात अशी संघटना असणे आवश्यक ठरणार आहे.

तिचा आग्रह धरणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मुत्सद्दीपणाचे ठरेल. वातावरण निर्मिती आणि राज्याच्या भूमिकेबद्दल अनुकूलता निर्माण करण्यासाठी ते उपयोगी पडेल. आलमट्टी प्रकरण पुन्हा पाणी तंटा लवादापुढे मांडणे पुरेसे नाही, असेही श्री. पुरंदरे म्हणाले.

पाणी तंटा लवाद असो किंवा अन्य कोणतेही जल-न्याय व्यासपीठ असो; त्यासमोर मांडणी करताना आता हेलसिन्की रूल्स, बर्लिन रूल्स आणि तत्सम यूनो स्तरावरील अभ्यास उपयोगी पडणार आहेत. त्याचे भान ठेवून शासनाने जल-कारभारविषयक तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नदी पाणी तंटा कायद्यांचे अभ्यासक विधिज्ञ, जल वैज्ञानिक आणि स्थापत्य अभियंते यांचा अभ्यास गट नेमणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेण्यासाठी एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली गेली होती. त्या धर्तीवर कृष्णा खोऱ्यातील एखाद्या अभ्यासू नेत्याच्या अध्यक्षतेखाली जल समिती नेमावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT