Increase dengue patients in Belgaum Panic among citizens  esakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात डेंग्यूच्या रुग्णात वाढ; नागरिकांमध्ये घबराट

बेळगाव शहर आणि परिसरात डेंग्यूच्या रुग्णात मोठी वाढ होत असून सध्या जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे २० रुग्ण दाखल

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : शहर आणि परिसरात डेंग्यूच्या रुग्णात मोठी वाढ होत असून सध्या जिल्हा रुग्णालयात डेंग्यूचे २० रुग्ण दाखल झाले आहेत. तर विविध भागातील खाजगी रुग्णालयात देखिल उपचार करून घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घराशेजारी पाणी साचणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. पावसाला सुरुवात झाल्यापासून अनेकाना सर्दी, ताप, खोकला आदी प्रकारचे आजार होऊ लागले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून डॉक्टरांकडे रुग्णांची संख्या वाढली शहर आणि परिसरातील काही भागामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिका व आरोग्य विभागाने ज्या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.

त्या ठिकाणी डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करणे आवश्यक आहे. तसेच त्या भागात स्वच्छतेची कामे देखील हाती घेणे गरजेचे आहे. तर नागरीकानी अंगदुखी, सांधेदुखी, डोखेदुःखी, थकवा येणे, मळमळ, उलटी, अंगावर पुरळ येणे आदी प्रकारची लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्घेणे आवश्यक आहे. डेंग्यूची लागण झाल्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात त्यामुळे योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची ही शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी डेंगू बाबत वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

जिल्हा रुग्णालयात सध्या वीस रुग्ण करुन घेत आहेत. मात्र खाजगी रुग्णालयात उपचार करून घेणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक प्रमाणात असल्याची माहिती पुढे आले आहे. बिम्सच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार १४१ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली यावेळी २० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्दी, ताप, आंगदुखी, अन्न गोड न लागणे, छातीत दुखणे आदी प्रकारची लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

टोलचे १०० रुपये वाचवायला शॉर्टकट घेतला, पण इंजिनिअरनं गमावला जीव; १५ दिवसांपूर्वी घेतलेली नवी कार

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक मतदान पेट्या ने-आण करण्यासाठी पीएमपीएम एलच्या १ हजार ५६ बसेस धावणार

बिग बॉस सीजन 3 विजेत्या विशाल निकमने शेअर केले खऱ्या सौंदर्यासोबत फोटो ! 'या' अभिनेत्रीला करतोय डेट

Solapur Crime: बीड जिल्ह्यातील डॉक्टरास गर्भलिंगनिदान प्रकरणी अटक; बार्शीतील प्रकरण, तीनही संशयितांना पोलिस कोठडी!

SCROLL FOR NEXT