Increase in the level of these rivers; Rainfall continues in dam area 
पश्चिम महाराष्ट्र

या नद्यांच्या पातळीत वाढ; धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम

सकाळवृत्तसेवा

सांगली : चांदोली, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. चांदोलीतून एक हजार तर कोयना धरणातून 2 हजार 100 क्‍युसेक पाणी सोडले जात आहे. पावसामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. चांदोली धरणात 12.57 टी. एम. सी. पाणीसाठा झाला. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आज जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात अन्यत्र पावसाचा जोर कमी झाला. मात्र दिवसभर रिमझिम सुरु होती. थोड्याशा उघडीपीने बहुतांश भागात पेरण्यांची धांदल उडाल्याचे चित्र होते. 

दोन दिवसांपासून पाऊस सुरु झाला. धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. चांदोली धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांत तब्बल 27 मि.मी. पावसाची नोंद झाली. आज दिवसभर जोरदार पाऊस सुरुच राहिला. धरणाची पाणी साठवण क्षमता 34.20 टी.एम.सी. आहे. सद्यस्थितीत 12.57 टी.एम.सी. पाणी आहे. कोयना धरण क्षेत्रातही मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना परिसरात 24 तासात 64 मि.मी. पाऊस झाला. धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी. आहे. सध्या धरणात 33.27 टी.एम.सी. पाणी आहे. महाबळेश्वर, धोम आणि कण्हेर धरणाच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरु आहे. चांदोलीतून एक हजार तर कोयना धरणातून 2100 क्‍युसेक पाणी सोडले जात आहे. कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. वारणेवरील पाच बंधारे रात्री उशिरा पाण्याखाली गेले. चिकुर्डे, शिगाव, दुधगाव, कणेगाव, समडोळी हे बंधारे पाण्याखाली आहेत. कृष्णा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेले नाहीत. सांगलीच्या आयर्विन पुलाजवळ सायंकाळी पाणीपातळी सात, तर अंकली पुलाजवळ 10.5 फूट होती. 

पश्‍चिम भागात शिराळा व वाळवा तालुक्‍यात जोरदार पाऊस सुरू आहे. येथे 24 तासांत 43.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर वाढल्याने भाताला अनुकूल वातावरण आहे. तालुक्‍यात पावसाची संततधार सुरु असल्याने शेतीची कामे थांबलीत. बहुतांश भागात पाणी साचलेय. वाळवा, पलूस, कडेगाव आणि मिरज पश्‍चिम भागातही रिमझिम सुरु आहे. आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली. पश्‍चिम भागात सोयाबीन, भूईमूगाची टोकणाची कामे जोमात सुरु आहेत. पेरणीसाठी पोषण वातावरण असल्याने शेतकऱ्यांची धांदल उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. 

खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत या तालुक्‍यातील अनेक गावांत चांगल्या पावसाने हजेरी लावली. खानापूर तालुक्‍यातील काही गावांत पावसाचा जोर कमी राहिला. दुष्काळी तालुका असलेल्या आटपाडी तालुक्‍यात दोन दिवस जोरदार पावसाने हजेरी लावल्यानंतर उसंत मिळाली. पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पूर्व भागात ज्वारी, बाजरी, कडधान्च्या पेरण्या सुरु झाल्यात. 

सांगलीत रिमझिम 
सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी हलक्‍या सरी झाल्या. अधून-मधून रिमझिम सुरु होती. दोन दिवस झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले. नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र शहर व परिसरात आहे. 

जिल्ह्यात 16.4 मि.मी. पाऊस 

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 16.4 मि.मी. पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्‍यात सर्वाधिक 43.8 मि.मी. पाऊस झाला. तालुकानिहाय पाऊस असाः (कंसात एक जूनपासून आजअखेर झालेला पाऊस) मिरज 13.7 (70.9), जत 12.4 (56.5), खानापूर-विटा 7.2 (120.4), वाळवा-इस्लामपूर 21.5 (131.2), तासगाव 11.5 (78.3), शिराळा 43.8 (273.4), कवठेमहांकाळ 20.5 (72.9), पलूस 11.5 (100.7), कडेगाव 7.6 (103.2). 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT