makarand-anaspure.
makarand-anaspure. 
पश्चिम महाराष्ट्र

दुष्काळी शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मकरंद आनासपूरे ४५ गावांना भेट देणा

महेश पाटील

सलगर बुद्रुक - या वर्षी शेतकरी मोठ्या दुष्काळाला तोंड देत आहेत. पण जी गांवे निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत आशा गावातील परिस्थिती ती आत्ताच भयानक बनली आहे. पुढे दहा महिने दुष्काळाचे आहेत, त्यामुळे आशा संकटात शेतकऱ्यांनी धीराने सामोरे जावे, मी ही शेतकऱ्यांमध्ये मनोधैर्य वाढविण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी ४५ गावास भेट देणार असल्याचे प्रसिध्द अभिनेते व नाम फौंडेशनचे संचालक मकरंद अनासपूरे यांनी ४५ कोरडवाहू गावे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाजवळास सांगितले.

सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथिल कार्यक्रमास आल्यानंतर ४५ कोरडवाहू गांवे संघर्ष समितीने आभिनेते अनासपूरे यांना येण्यापूर्वीच भेटण्याची इच्छा व्यक्त केल्या नंतर त्यांनी ४५ कोरडवाहू गांवे संघर्ष समितीला भेटण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी अनासपूरे यांनी वरील मत व्यक्त केले.

४५ कोरडवाहू गांवे संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश पडवळे यांनी निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आसनाऱ्या गावांची सध्या पाण्या आभावी जनावरे, पिकांचे होत आसलेले हाल व शासन दुष्काळ जाहिर करुनही मदत करत नसल्या बद्दलची माहिती दिली. आशा संकटातच दोन शेतकऱ्यांनी व दोन ऊसतोड कामगारांनी आत्महत्या केल्याने शेतकरीही चलबीचल झाले आहेत. संकटातून जात आसलेल्या ४५ गावातील शेतकऱ्यांचे मानोधैर्य वाढविण्यासाठी भेट द्यावी व नाम फौंडेशनच्या माध्यमातून या भागात जलसंधारणाचे काम करावे आशी मागणी ४५ कोरडवाहू संघर्ष समितीने केल्यानंतर अभिनेते मकरंद अनासपूरे यांनी तात्काळ ही मागणी मान्य करुन सोलापूरच्या पुढिल दौऱ्यात निश्चित ४५ गावांना भेट देऊन तेथिल परिस्थिती नुसार काय मदत करता येईल ती करेन असे सांगितले.

यावेळी शिष्टमंडळात निमंत्रक अंकुश पडवळे,सरपंच नानासाहेब हेगडे, गुरलिंग दोलतडे, बापूसाहेब मेटकरी, तानाजी चौगुले, अंकुश खताळ, आशोक वाले, संभाजी डांगे, भगवान चौगुले, बाळासाहेब लेंडवे, आण्णा माळी, दिनेश लेंगरे, विनोद बंडगर, आण्णा मळगे, दत्ता शेजाळ, अनिल पडवळे, शिवाजी टकले आदि शेतकरी सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT