पश्चिम महाराष्ट्र

कडक सॅल्यूट! देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभाचा 'बेळगाव'ला मान; कर्नाटकाने राखली राष्ट्रप्रेमाची शान

महापालिका प्रशासकांनी अखेर वर्षातून तीनवेळा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : देशरक्षणासाठी योद्धे निर्माण करण्याचे केंद्र असलेल्या बेळगावात देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ आहे. त्यावर फडकणारा तिरंगा बेळगावच्या राष्ट्रप्रेमाची साक्ष देणारा आहे. या ध्वजस्तंभामुळे बेळगावची वेगळी ओळखही निर्माण झाली आहे. राज्य शासनाच्या शंभर कोटी विशेष निधीतून हा ध्वजस्तंभ उभारण्यात आला आहे. तत्कालीन आमदार फिरोज सेठ यांची ही संकल्पना होती.

२०१८ मध्ये तत्कालीन जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या हस्ते पहिल्यांदा हा ध्वज फडकला. पण, पाऊस आणि वाऱ्यामुळे उंच ध्वजाचे वेळोवेळी नुकसान झाले. रोज ध्वज फडकवणे अवघड ठरले. त्यामुळे तत्कालीन महापालिका प्रशासकांनी विशेष परवानगी घेऊन तिरंग्याचा आकार कमी केला. तरीही अनेक वेळा ध्वजाचे नुकसान होऊ लागले. महापालिका प्रशासकांनी अखेर वर्षातून तीनवेळा ध्वज फडकवण्याचा निर्णय घेतला. यात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन व कर्नाटक राज्योत्सव दिनाचा समावेश आहे. इतका मोठा निर्णय घेऊनही २०२० च्या प्रजास्तक दिनी ध्वज फडकला नाही.

ध्वजस्तंभ नादुरुस्त झाल्याने अखेर हैदराबादमधून विशेष दुरुस्ती पथकाला पाचारण करण्यात आले. बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीकडे देखभालीचा ठेका असून आठ दिवस हे दुरुस्ती कार्य चालले. त्यानंतर २०२० चा स्वातंत्र्य दिन, राज्योत्सव व यंदाच्या प्रजासत्ताक दिनी ध्वज फडकला. बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री देशातील सर्वात जुनी रेजिमेंट आहे. त्यापाठोपाठ ज्युनियर लीडर्स विंग हे देशातील एकमेव कमांडो ट्रेनिंग सेंटर येथेच आहे. महार रेजिमेंटच्या प्रादेशिक सेनेच्या तुकडीसह वायु सैनिकांना प्राथमिक धडे देणारी एकमेव प्रशिक्षण संस्था बेळगावातच आहे.

निमलष्करी दलाच्या केंद्रीय राखीव पोलीस दल, कोब्रा कमांडो प्रशिक्षण तळ, चीन सीमेचे संरक्षण करणारी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांची बटालियन देखील कार्यरत आहे. तस्करी प्रशिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बेळगावला संरक्षण दलाने 'क्रेडल ऑफ इन्फंट्री' चा किताब बहाल केला आहे. अशा बेळगावात देशातील सर्वात उंच ध्वजस्तंभ असणे अभिमानाची बाब आहे.

देशातील पाच सर्वात उंच ध्वजस्तंभ

ठिकाण उंची (फुटात)

  • बेळगाव (कर्नाटक) ३६१

  • अत्तारी बॉर्डर (पंजाब) ३६०

  • पुणे (महाराष्ट्र) ३५१

  • गुवाहाटी (सिक्कीम) ३१९.५

  • कोल्हापूर (महाराष्ट्र) ३०३

बेळगावमधील ध्वजस्तंभ

  • ध्वजस्तंभाची उंची ः ३६१ मीटर

  • ध्वजाचा पहिला आकार ः ९,६०० चौरस फूट

  • ध्वजाचा आताचा आकार ः ५,४०० चौरस फूट

  • ध्वजाचे एकूण वजन ः ३५० किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! आपच्या बड्या नेत्यावर बेछूट गोळीबार; माजी डीएसपींनी घडवलं कृत्य, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : राज्य सरकारचं शिष्टमंडळ बच्चू कडूंची भेट घेणार

Badamrao Pandit : भाजप प्रवेश होताच माजी आमदार आक्रमक! विजयसिंह पंडित हे अचानक अन् पैशाने झालेले आमदार

Women's World Cup 2025: २० चौकार,४ षटकार... सेमीफायनलमध्ये द. आफ्रिकेच्या कर्णधाराचं वादळी शतक; विश्वविक्रमही केला नावावर

'रश्मिका मंदानाला लागले आई होण्याचे वेध...' बाळाबद्दल बोलताना म्हणाली...'योग्य वयात बाळ झालं की...'

SCROLL FOR NEXT