Beedi Worker
Beedi Worker 
पश्चिम महाराष्ट्र

"यांच्या' दहशतीची "या' उद्योगाला धास्ती; ठेवणार उद्योग बंद

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सीटू व कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे शहरात बुधवारी (ता. 8) पुकारण्यात आलेल्या सार्वत्रिक देशव्यापी संपाला विडी उद्योजकांचा पाठिंबा नाही. मात्र कामगार संघटनांच्या गुंडशाहीमुळे खबरदारी म्हणून, कामगार व कारखानदारांचे नुकसान होऊ नये म्हणून विडी उद्योग बुधवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सोलापूर विडी उद्योग संघाचे सचिव सुनील क्षत्रिय यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

कामगार व कारखानदारांच्या नुकसानीची भीती
श्री. क्षत्रिय म्हणाले, विडी उद्योग उद्या (बुधवारी) बंद राहणार आहे. मात्र याचा अर्थ असा नाही, की संपाला विडी उद्योगाचा पाठिंबा आहे. यापूर्वी अनेकदा संप झाले. या संपात कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून विडी कारखान्यांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. गाड्या जाळण्याचाही प्रयत्न झाला. यामुळे वाहनचालक जखमीही झाले. कारखान्यांमध्ये घुसून तयार विड्यांचे नुकसान करण्यात आले. प्रसंगी विडी चेकर कामगारांना मारहाणही करण्यात आली. आपल्या ब्रॅंचमध्ये तयार विड्या देण्यासाठी जाणाऱ्या व कच्चा माल घेऊन घरी परतणाऱ्या महिलांनाही मारहाण करण्यात आली. विड्या देण्यासाठी रिक्षातून व पायी जाणाऱ्या कामगारांना मारहाण करण्यात येत असल्याने रिक्षावालेही कामगारांना रिक्षात घेत नाहीत. यामुळे कामगारांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. कामगारांच्या जीवितेचे व विडी कंपन्यांच्या उत्पादनांचे नुकसान टाळावे यासाठी विडी उद्योग एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दोन ते सव्वादोन कोटींची उलाढाल होणार ठप्प
शहरात एकूण 14 विडी कंपन्या असून, त्यांच्या 115 ब्रॅंचेसमध्ये जवळपास 50 हजार कामगार दैनंदिन विड्या वळून देतात. दररोज साडेतीन कोटी विड्यांचे उत्पादन होते. एका दिवसाची दोन ते सव्वादोन कोटींची उलाढाल या संपामुळे ठप्प होणार आहे.

याआधीही अनेक संपांमध्ये विडी कामगार व उद्योजकांना खूप नुकसान सोसावे लागले होते. आंदोलनकर्त्या कामगार संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून महिला कामगारांना मारहाणही होत असते. अशा गुंडांवर केसेस करून वेळ घालवण्यापेक्षा व नुकसान टाळण्याकरिता बंद ठेवणेच योग्य, असा निर्णय घेण्यात आला.
- सुनील क्षत्रिय, सचिव, सोलापूर विडी उद्योग संघ

सध्या विडी उद्योगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या मार्केटमध्ये विड्यांची मागणी कमी आहे. 28 टक्के जीएसटी व दीड टक्का एक्‍साईज ड्यूटी अशा शासनाच्या धोरणामुळेही हा उद्योग संकटात सापडला आहे. त्यामुळे कामगार संघटनांकडून होणाऱ्या अवास्तव सर्वच मागण्या पूर्ण होऊ शकत नाहीत.
- बाळासाहेब जगदाळे, प्रवक्ता, सोलापूर विडी उद्योग संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT