Paschim, maharashtra sakal
पश्चिम महाराष्ट्र

जेष्ठ नागरिक म्हणून शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थींचा शोध

दरम्यान यात पात्र लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.

विनायक जाधव

बेळगाव : जेष्ठ नागरिक म्हणून शासनाच्या पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या अपात्र लाभार्थींचा शोध घेण्यासाठी बेळगाव तालुक्यातील १५ हजारहून अधिक तर राज्यातील १ लाख ४१ हजार पेन्शन महसूल खात्याने बंद केले आहेत. दरम्यान यात पात्र लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे.

आधारकार्डमध्ये वयाची चुकीची नोंद करून त्या आधारावर अनेक अपात्रांनी संध्या सुरक्षा योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर डल्ला मारला आहे. कमी वय असतानाही अनेकजण ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन घेत आहेत. मागील दोन वर्षात संपूर्ण राज्यातच ही संख्या वाढली आहे. सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिक, विधवा, दिव्यांग, तृतीयपंथी, चाळीस वर्षेवरील अविवाहित महिला, कर्जामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी, ॲसिड हल्ल्यातील जखमी यांना शासनाकडून दरमहा पेन्शन दिली जाते. राज्यात असे सुमारे ६८,९५,६९४ लाभार्थी आहेत. यासाठी शासनाने नुकतेच ७५६१.४८ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे.

मागील दोन वर्षात ५,४६,८६७ लाभार्थ्यांची महसूल खात्याने पेन्शन बंद केली आहे. यापैकी अनेकांनी पेन्शन सुरू करण्यासाठी पुन्हा अर्ज केल्याने त्यांची पाहणी करून पेन्शन सुरू केली जात आहे. यापैकी ४,९९,२९१ जणांची पेन्शन सुरू करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. तर ९४,०८९ लाभार्थी अपात्र असल्याचे दिसून आले असून त्यांची पेन्शन कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. यासह अध्याप ४७,५७४ जनांची पेन्शन तात्कालिक स्वरूपात थांबविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Thane News: भाईंदर-ठाणे प्रवास होणार वेगवान! कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ट्रॅफिक जामला ब्रेक मिळणार, कसा असेल मार्ग?

Ketan Agrawal Murder Case: सिया गोयलच्या वकीलपत्रासाठी दोन वकिलांमध्ये पेटला वाद! अ‍ॅड. विपूल दुशिंग यांचं म्हणणं काय?

Latest Marathi News Live Update: विधानसभेत 'पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटक कारवायांवरील नियंत्रण विधेयक, २०२६' मंजूर करण्यासाठी मतदान सुरू

Marriage Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांना बायकोच्या रूपात मिळते लक्ष्मी; पतीच्या यशामागे असतो फक्त तिचाच हात

SCROLL FOR NEXT