Information of those who entered in Sangli district at a click
Information of those who entered in Sangli district at a click 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात येणाऱ्यांची माहिती एका क्‍लिकवर

शैलेश पेटकर : सकाळ वृत्तसेवा

सांगली : परजिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात येणाऱ्यांमुळे "कोरोना'चा प्रादुर्भाव होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ऑनलाईन यंत्रणा सुरू केली आहे. गुगल स्प्रेडशीटच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांसह फिव्हर क्‍लिनिकमध्ये येणाऱ्यांची नोंद केली जाते. त्यातील कोणाला लक्षणे आढळून आल्यास तातडीने कोरोना रुग्णालयात दाखल केले जाते. या ऑनलाईन यंत्रणेमुळे मंगळवारी घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडला. त्याच्याकडून कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वीच प्रशासनाने त्याला आयसोलेशन कक्षात दाखल केले. 

"कोरोना'चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सीमाभागात कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. सीमाभागांची वर्गवारी करण्यात आली आहे. "अ' वर्गाच्या सीमाभागात मोठा बंदोबस्त आहे. त्याशिवाय दोन वैद्यकीय पथकेही आहेत. येणाऱ्या प्रत्येकाची माहिती घेतली जात आहे. ही माहिती नियंत्रण कक्षाला कळवण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आली आहे. अमित टंडन हे याचे पूर्ण नियंत्रण करीत आहेत. 

चेकपोस्टवर येणाऱ्या प्रत्येकाची सविस्तर माहिती गुगल स्प्रेडशीटवर भरली जाते. फिव्हर क्‍लिनिक व घरोघरी होणाऱ्या सर्वेक्षणाचीही माहिती त्यावर दिली जाते आहे. त्यात कोणाला कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने ती माहिती नियंत्रण कक्षास मिळते. त्या कक्षातून कोरोना रुग्णालयात याची माहिती दिली जाते. तेथून तातडीने यंत्रणा कामाला लागते. 
जिल्हा प्रशासनाने केलेल्या या यंत्रणेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होत आहे. मंगळवारी घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथे आढळलेल्या एका रुग्णाकडून फैलाव होण्यापूर्वीच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमधील वॉर रूममधून जिल्ह्यात येणाऱ्यांची माहिती एका क्‍लिकवर मिळवली जाते. 

""गुगल स्प्रेडशीटच्या माध्यमातून जिल्ह्यात येणाऱ्यांसह फिव्हर क्‍लिनिकमध्ये येणाऱ्यांची माहिती यावर दिली जाते. नियंत्रण कक्षात ही माहिती संकलित केली जात आहे. संशयितांना तातडीने उपचारासाठी दाखल केले जाते. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होत आहे.'' 
-डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक 

खासगी डॉक्‍टरांनाही लिंक 
गुगल स्प्रेडशीटची लिंक ही चेकपोस्टवर असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली आहे. खासगी डॉक्‍टरांनाही लिंक देण्यात आली आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची माहिती त्यावर भरली जाते. ज्याला लक्षणे दिसून येतील, त्यास तातडीने कोरोना रुग्णालयात दाखल केले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: 'एक्झिट पोलवर अजिबात विश्वास नाही'; महाराष्ट्र, यूपी, बिहारमध्ये किती जागा मिळतील? ठाकरे गटाचा काय आहे अंदाज?

Assembly Election Result 2024: सिक्कीम, अरुणाचलमध्ये 'या' पक्षांचे सरकार पक्कं, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही जलवा

Viral Video: रवीना टंडनचा दारु पिऊन धिंगाणा? वृद्ध महिलेला मारहाण केल्याचा आरोप; व्हिडिओ होतोय व्हायरल

Assembly Election Result: टीम इंडियाच्या माजी कर्णधाराच्या पदरी निराशा, 10 वर्षात पराभवाची डबल हॅट्रिक

Arunachal Pradesh Election Result Live: अरुणाचलमध्ये भाजप एकतर्फी विजयाकडे, राष्ट्रवादी देखील आघाडीवर

SCROLL FOR NEXT