bandhara
bandhara 
पश्चिम महाराष्ट्र

मोहोळला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात अपुरे पाणी

सकाळवृत्तसेवा

मोहोळ : सुमारे पंचेचाळीस हजार लोकसंख्या असणाऱ्या मोहोळ  शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात केवळ बारा ते पंधरा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नगरपरिषद प्रशासनाने उपाययोजना न केल्यास ऐन यात्राकाळात शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

हद्दवाढ भागासह शहराची लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार एवढी आहे. गेल्या मार्चमध्ये उजनी धरणातून शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी सीना नदीत पाणी सोडले होते. त्यावर आजपर्यंत काम भागले . चालू वर्षी पाऊस नसल्याने शहरातील बोअर कोरडे पडले आहेत, तर वाड्या-वस्त्यांवरील विहिरीच्या पाण्याने ही तळ गाठला आहे. शहराला दररोज सुमारे अकरा लाख लिटर पाणी लागते. बंधाऱ्यात पाणी शिल्लक राहावे यासाठी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे, नदीत सोडलेल्या पाण्याने बंधारा भरला होता मात्र एक महिन्याच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंधाऱ्यात केवळ एकच मीटर पाणीसाठा शिल्लक आहे.

शनिवार (ता. 4) पासून मोहोळचे ग्रामदैवत नागनाथ महाराजांची यात्रा सुरू होत आहे. यात्रेनिमित्त शहरवासीयांचे अनेक नातेवाईक यात्रेसाठी मोहोळ येथे येतात. त्यावेळी मात्र मोठी पाणीटंचाई जाणवणार आहे. पुढील मे महिन्यात कडक उन्हामुळे पाण्याची परिस्थिती कठीण होणार आहे. सध्या बंधाऱ्यातील पाण्याचे बाष्पीभवन ही मोठ्या प्रमाणात होत आहे. उजनीतील पाणी पातळीही खोलवर गेल्याने, पुन्हा नदीला पाणी येईल याची शाश्वती नाही. तर घाटणे बॅरेज मध्येही पाणी नसल्याने तेथून सोडणेही शक्य नाही.

नगरपरिषद प्रशासनाने उपलब्ध पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करणे गरजेचे आहे, नियोजन नसल्यामुळे शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे .बंधाऱ्यावर रात्रंदिवस पाणी सुरक्षा पथक ठेवले पाहिजे. पाणी उपसा करणाऱ्या मोटारी ताब्यात घेतल्या पाहिजेत, पाण्याचा पुढचा महिना याच्यापेक्षा कठीण जाणार आहे.
- सतीश काळे, तालुका अध्यक्ष भाजपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT