पश्चिम महाराष्ट्र

घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना इचलकरंजीत अटक

पंडित कोंडेकर

इचलकरंजी - येथील स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सुमारे १६ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये गेल्या काही दिवसापासून जयसिंगपूर येथे झालेल्या घरफोडींचा  समावेश आहे. या चोरट्यांकडून तब्बल ४ लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक उर्फ सनदी (वय २६, रा. माधवनगर, सांगली, मूळ होसुर, बेळगाव व  राघवेंद्र उर्फ नागराज शंभू शेट्टी (वय २७, राहणार माधवनगर, सांगली, मुळगाव इडगुंजी, ता. कारवार) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांच्यावर कर्नाटकात चोरी, जबरी चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसापासून जयसिंगपूर परिसरात चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते. त्यामध्ये रेल्वे स्टेशन - उदगाव जाणारे  बायपासवर सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चोरीतील सोन्याचे दागिने सापडले. ते सेंट्रींग काम करतात. त्यांच्याकडून आणखीन काही चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी दिली. यावेळी इचरकंजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, जयसिंगपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT