अश्वत्थ नारायण sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : आंतरराज्य वाहतूक सुरु राहणार

मंत्री अश्वत्थ नारायण; कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी कृतीशील पावले

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोना आणि नवीन ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ झाली असली तरी आंतरराज्य वाहतूक बंद ठेवण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारपुढे नाही, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री अश्वत्थ नारायण यांनी दिली. येथील एका कार्यक्रमानिमित्त बुधवारी (ता. ५) ते बेळगावला आले होते. यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांना उपचार त्वरीत उपलब्ध करून देऊन संसर्ग नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी प्राध्यान्य देत आहोत. पण, इतरांना त्याचा परिणाम होणार नाही, त्याची खबरदारी घेत आहे.(corona and omicron)

आंतरराज्य वाहतूक व प्रवासासाठी सशर्त अनुमती कायम ठेवण्यात आलेली आहे. पण, आंतरराज्य वाहतूक आणि सेवा बंद ठेवण्यात येणार नाही. व्यत्यय उद्‍भवणार नाही आणि परिस्थिती बिघडू नये, त्यासाठी सरकारने १५ दिवसांचा कालावधी निश्‍तिच केला आहे. या दरम्यान विकेंड कर्फ्यूसह खबरदारी घेतल्या जात आहेत. संपूर्ण लॉकडाऊन रोखणे यामागील उद्देश आहे. कार्यालये, पब, बार व थिएटर इत्यादी ठिकाणी ५० टक्के क्षमता निश्‍चित केली आहे. प्रामुख्याने बंगळुरू जिल्ह्याची परिस्थिती सामान्य करण्याचा विचार आहे. त्यामुळे शाळा दोन आठवड्यांपासून बंद ठेवल्या आहेत. या व्यतिरिक्त १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण सुरु झाले आहे.(belgaum news)

सर्व पातळीवर रोग नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी पाऊल उचलले जात असल्याचे मंत्री अश्‍वत्थ यांनी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना बूस्टर डोसही दिला जात आहे. परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व ती सज्जता केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

‘डी. के. ब्रदर्स’वर टीका

डी. के. ब्रदर्शकडून केवळ वर्चस्व आणि स्वार्थ साधण्यास प्राध्यान्य देत आहेत. पण, हे योग्य नाही. तुम्ही साधलेली प्रगती कामातून दिसावी. भागातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. केवळ वर्चस्वासाठी दादागिरी, अंगावर धावून येणे ही चांगली लक्षणे नव्हेत, असा टोला मंत्री अश्वत्थ नारायण यांनी लगाविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon 2026: पावसाचा वेग मंदावला! अरबी समुद्रातील कोरडे वारे, बंगालचे बाष्प प्रशांत महासागराकडे, हवामानशास्त्रज्ञांनी नेमकी काय सांगितली कारणे?

Police Constable Death : चंदगड हादरलं! 42 वर्षीय पोलिसानं स्वत:वर गोळी झाडून संपवलं आयुष्य; लष्करात 17 वर्षे बजावलीये सेवा, सध्या मुंबईत होते कार्यरत

शिवसेनेत पुन्हा भूकंप! ६ खासदार फुटण्याची भीती, उद्धव ठाकरे गट सक्रिय; अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

Pune 11th Admission: शिक्षण विभागाचा ‘रात्रीस खेळ चाले’! अकरावीच्या दुसऱ्या फेरीची प्रवेशनिश्‍चिती रात्री नऊपर्यंत, पालकांमध्ये संभ्रम

Argentina vs Algeria : १९६६ नंतर कोणालाच नाही जमले, ते लिओनेल मेस्सीने केले... १ गोल अन् ५ भन्नाट विक्रम, पेले यांचाही पराक्रम मोडला

SCROLL FOR NEXT