Islampur administration run away Nationalist Congress Party protest sakal
पश्चिम महाराष्ट्र

Islampur : प्रशासनाला सळो की पळो करून सोडू; राष्ट्रवादीचा नगरपालिकेवर धडक मोर्चा!

प्रशासनाने मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास प्रशासनाला सळो की पळो करून सोडू, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

धर्मवीर पाटील : सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : शहरातील विविध नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. प्रशासनाला दिलेल्या निवेदनाची दखल न घेतली गेल्याने हा मोर्चा काढला. प्रशासनाने मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास प्रशासनाला सळो की पळो करून सोडू, असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादी भवनपासून मोर्चाला सुरवात झाली..यल्लम्मा चौक, गांधी चौक, तहसील कार्यालय चौक ते नगरपालिका इमारत असा मोर्चा निघाला. यामध्ये प्रशासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पालिकेच्या आवारात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील म्हणाले, "गेली पंधरा महिने प्रशासक येऊन आले, सुविधा नाहीत.

मुख्याधिकाऱ्यांना आम्ही आणले, तशी त्यांना परत घालवायची आमची ताकद आहे. आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराला २०३० पर्यंत मुबलक प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन केले होते, परंतु आताच पाणी पुरवठा अपुरा होत आहे. आमचे निवेदन गांभीर्याने घेतले नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता पेटून उठेल." माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील म्हणाले, "आरोग्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत.

टँकर निकामी आहेत. पंतप्रधान आवास योजनेकडेही लक्ष नाही. नागरिकांना मोकाट जनावरांचा प्रचंड त्रास सुरू आहे. स्मशानभूमीत पाणी, विजेची व्यवस्था नाही." माजी नगराध्यक्ष प्रा. अरुणादेवी पाटील म्हणाल्या, "स्वच्छतेचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. आरोग्य विभाग काय करतोय? घंटागाडीवर फक्त गाणेच मोठ्याने वाजते, प्रत्यक्ष काम काहीच नाही.

वाढीव घरपट्टी आणि शास्तीसंदर्भात दिलेले आश्वासन प्रशासनाने पाळले नाही. लोकांना जीवन असह्य झालेय, याचा विचार व्हावा." महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष रोझा किणीकर म्हणाल्या, "हे अधिकारी म्हणजे लोकशाहीला लागलेला कलंक आहे. त्यांनी शहराचे विद्रुपीकरण केले आहे.

" माजी नगरसेवक खंडेराव जाधव म्हणाले, "गेल्या पाच वर्षांच्या सत्तेत शहराच्या मागे साडेसाती लागली आहे. या पाच वर्षात विकासाचा एकही ठराव झाला नाही. आमची भुयारी गटार योजना यांनी अट्टाहासाने सुरू केली आणि नियोजनाअभावी त्याचा आज शहराला नाहक त्रास होत आहे. राष्ट्रवादीने वेळोवेळी जाणीव करून देऊनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.

गुंठेवारी नसताना बांधकाम परवाना कसा दिला? त्याची चौकशी व्हावी. प्रशासन कुणाच्या इशाऱ्यावर चालत आहे? अपूर्ण योजनांवर लक्ष द्यावे. " माजी नगराध्यक्ष चिमन डांगे म्हणाले, "नागरिकांना दिलेली चुकीची बिले दुरुस्त करावीत, ज्यादा आलेली बिले परत द्यावीत. घरपट्टीत भरमसाठ वाढ केलीय.

नागरिक मेटाकुटीला आलेयत. अन्यायकारक घरपट्टी कमी करावी. शहरातील उद्याने भकास झालीयत. नाट्यगृहाची दुरवस्था झाली आहे. गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रिया सुलभ करावी." भगवानराव पाटील म्हणाले, "अधिकारी हरामखोर आहेत.

आपण काय करतो आहोत, याचे त्यांना भान नाही." ऍड. धैर्यशील पाटील, रुपाली जाधव, सुनीता सपकाळ, विश्वनाथ डांगे, विशाल सूर्यवंशी,सचिन कोळी, स्वरूप मोरे, राजू देसाई, प्रदीप थोरात आदी उपस्थित होते.

शहरातील कुणीही रात्रीच्या वेळी मटण मार्केटपासून अनवाणी चालत जाऊन दाखवावे, त्याला ११५१ रुपयांचे बक्षीस देऊ, असे आवाहन अरुण कांबळे यांनी यावेळी केले. शहरात एक विकासाचे काम झाले असेल तर ते दाखवावे, त्यालाही बक्षीस देऊ अशी खिल्ली खंडेराव जाधव यांनी उडवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : कपिल देव पाकिस्तानवर भडकले! म्हणाले, एका पिढीची तुम्ही वाट लावताय, तुमच्याच खेळाडूंचं नुकसान करताय...

मोठी बातमी! राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ कागच भिरकावणारे सहा खासदार निलंबित, अध्यक्षांची कारवाई

Pankaja Munde: ''मला कालच कळलं होतं...'', पंकजा मुंडेंनी सांगितली हेलिकॉप्टरबद्दलची माहिती

'द अजित पवार' मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणालेले-

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये महायुती इतिहास घडवणार- एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT